Big Breaking! वासनेचे लांडगे धावत्या बसमध्ये! आधी मदतीचा बहाणा, मग २ तास सामूहिक अत्याचार; काळजाचा थरकाप उडवणारा क्रूरतेचा कळस!
देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं हादरली आहे. दिल्लीतील राणीबाग परिसरात एका खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने २०१२ च्या भीषण 'निर्भया हत्याकांड' प्रकरणाच्या काळ्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या असून, महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सोमवारी रात्री आपलं काम संपवून घरी जाण्यासाठी सरस्वती विहार बस स्थानकावर उभी होती. रात्रीची वेळ असल्याने रस्ते ओस पडले होते. रस्त्यावरील गर्दी कमी झाली होती. यावेळी तिने एका बसला हात देऊन थांबवलं. बस थांबताच चालक आणि वाहकाने (कंडक्टर) आधी तिला वेळ विचारला आणि काही समजण्याच्या आतच तिला जबरदस्तीने बसच्या आत ओढलं.
दोन तास अमानुष अत्याचार
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तिला चालत्या बसमध्ये राणीबाग ते नांगलोई दरम्यान सुमारे दोन तास फिरवत राहिले. या दोन तासांत चालत्या बसमध्ये तिच्यावर अमानुषपणे सामूहिक अत्याचार करण्यात आला. नराधमांनी तिला बेदम मारहाण करत तिच्या शरीराचे लचके तोडले. या कृत्यानंतर आरोपींनी पीडितेल निर्जन स्थळी रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि बससह पळ काढला.
निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती?
या घटनेने संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निर्भया हत्याकांडाच्या काळ्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. २०१२ मध्येही अशाच प्रकारे चालत्या बसमध्ये निर्भयावर अत्याचार करण्यात आला होता, ज्यानंतर कठोर कायदे करण्यात आले. मात्र, राणीबागची ही घटना पाहता दिल्ली आजही महिलांसाठी सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे.घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली. पीडितेच्या जबाबावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि विविध पथके स्थापन करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित बसची ओळख पटवण्यात आली. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी बसचा चालक आणि वाहक या दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हा घडलेली बस जप्त करण्यात आली असून ती फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.