पंजाबमध्ये स्थानिक नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालांमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाने लक्षणीय आघाडी घेतली आहे, तर काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.
भाजपचा दारुण पराभव झाला असून अपक्ष उमेदवार त्यांच्या पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या निकालासंदर्भात राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि 'आप'चे नेते मनीष सिसोदिया यांनी पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थासंदर्भात ट्विट करत भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. त्यांनी लिहिले, आम आदमी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा जनतेचा मेसेज आहे की, ते भगवंत मान सरकारने केलेल्या कामकाजावर खुश आहे. तसेच जनतेने हा देखील मेसेज दिला आहे की, ED पार्टीच्या तुष्टीकरणाचे राजकारण पंजाबच्या सरकारला मान्य नाहीये.
दुपारी 2 वाजेपर्यंत आम आदमी पक्षाचे तब्बल 583 नगरसेवकांनी बाजी मारली आहे. तर काँग्रेसने 204 आणि शिरोमणी अकाली दलाने 136 वॉर्डमध्ये आपला झेंडा रोवला आहे. तर बीजेपीने फक्त 52 जागांवर मिळवला आहे. 2027 ला होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षासाठी ही निवडणूक एक कसोटी मानली जात होती. 8 महानगरपालिका, 75 नगरपालिका आणि 19 नगरपंचायतीसह 102 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधि निवडण्यासाठी 26 मे रोजी मतदान झाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.