Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"सांगली बाजार समितीच्या भवितव्याचा फैसला आता ५ मे रोजी"

"सांगली बाजार समितीच्या भवितव्याचा फैसला आता ५ मे रोजी"

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनासंदर्भातील वादावर मंगळवारी (ता. २८) सुनावणी झाली, मात्र निर्णय लांबणीवर गेला. पुढील सुनावणी मंगळवार (ता. ५ मे) रोजी होईल.

.या प्रकरणाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे. प्रशासकीय यंत्रणेचा त्रिभाजनाचा निर्णय, त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या तीन याचिका आणि व्यापाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकांकडे लक्ष लागले आहे.

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये यापूर्वीची सुनावणी शासनाने बाजू मांडण्यासाठी वेळ मागितल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष होते.

आजच्या सुनावणीतही राज्य शासनाने पुन्हा वाढील मुदत मागितल्याचे सांगण्यात आले. यामुळे पुढील सुनावणी ५ मे २०२६ रोजी ठेवली आहे. ती सुनावणी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सांगली बाजार समितीचे कार्यक्षेत्र मिरज, जत आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यांमध्ये आहे. मुख्यमंत्री बाजार समिती योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यास स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जत व कवठेमहांकाळसाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या.

मात्र, या निर्णयाला विरोध करत ग्रामपंचायती, सोसायट्या, शेतकरी संघटना तसेच विद्यमान संचालक मंडळाने न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. सांगली चेंबर ऑफ कॉमर्सने त्रिभाजनाच्या समर्थनार्थ स्वतंत्र याचिका दाखल केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.