'मजामस्ती' नडली! नाशिकमध्ये पोलीस निरीक्षकाचा गोळीबार; पोलिसांचाच पोलिसांवर गुन्हा?
खाकीची मग्रुरी आणि मजामस्ती!
नाशिकमध्ये पोलीस ठाण्यासारख्या संवेदनशील ठिकाणी एका पोलीस निरीक्षकाने केवळ 'मजामस्ती' म्हणून शासकीय पिस्तुलातून गोळीबार करावा, म्हणजे मनमौजी कारभाराचा नमुना आहे. सामान्य नागरिकांना सुरक्षेचे धडे देणारेच आता कायद्याची ऐशीतैशी करत आहेत.सर्वात संशयास्पद आणि संतापजनक बाब म्हणजे, आठवडा उलटूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साधलेले मौन! यावर नासिक पोलिस आणि गृह विभाग बोलणार का?१. CCTV फुटेज गायब करण्याचा आणि 'डेली डायरी'मध्ये नोंद न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का?२. नियम धुडकावून गोळीबार करणाऱ्या आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी ही सुंदोपसुंदी सुरू आहे का?३. स्वतःच्याच माजलेल्या अधिकाऱ्यावर कारवाईचे धाडस दाखवणार की 'खाकी-खाकी भाई भाई' म्हणत विषय मिटवणार?गृह विभाग आणि सरकारने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी. असे अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.