Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत पोलिसांची मोठी कारवाई! जेसीबीच्या साहाय्याने गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त; ७५० लिटर रसायन जागीच नष्ट

सांगलीत पोलिसांची मोठी कारवाई! जेसीबीच्या साहाय्याने गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त; ७५० लिटर रसायन जागीच नष्ट

सांगली जिल्ह्यात अवैध गावठी दारू निर्मिती करणाऱ्यांवर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील ओढ्याच्या कडांना जमिनीखाली लपवून ठेवलेली गावठी दारूची हातभट्टी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा  आणि सांगली ग्रामीण पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून उद्ध्वस्त केली. या कारवाईत ७५० लिटर गावठी कच्च्या दारूचे रसायन आणि इतर साहित्य जेसीबीच्या साहाय्याने जागीच नष्ट करण्यात आले असून, एकूण ३१,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कंझारभाट वस्ती (कर्नाळ) येथील दोन संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या दोघेही फरार आहेत.
​सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यात अवैध दारूधंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक महादेव पोवार व त्यांचे पथक माधवनगर परिसरात पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार अभिजीत माळकर आणि विक्रम खोत यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील एस.सी. सीडस अँड फूड्स फॅक्टरीच्या उत्तरेस असलेल्या ओढ्यालगत जमिनीखाली बॅरल पुरून गावठी दारू तयार केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने सदर ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच तेथे उपस्थित असलेले दोन संशयित इसम अंधाराचा व झाडीचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी ओढ्याच्या परिसरात बारकाईने पाहणी केली असता, तेथे उग्र वास येत होता. जमिनीमध्ये थोड्या थोड्या अंतरावर लोखंडी बॅरल्स पुरल्याचे पोलिसांना दिसून आले.

​जेसीबीने केला चक्काचूर!
​सदर गावठी हातभट्टी आणि रसायन मानवी आरोग्यास अत्यंत अपायकारक व हानिकारक असल्याने, पोलिसांनी कायदेशीर कारवाईसाठी त्याचे सॅम्पल (नमुने) काढून घेतले. त्यानंतर जेसीबी मशीन मागवून जमिनीतून सर्व बॅरल्स बाहेर काढण्यात आले आणि संपूर्ण साहित्य जागीच नष्ट करून त्याचा चक्काचूर करण्यात आला.
​जप्त आणि नष्ट करण्यात आलेला मुद्देमाल:

अ.क्र. मुद्देमालाचा तपशील एकूण किंमत (रु.)
१ ७५० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन (२०० लि. क्षमतेचे ५ लोखंडी बॅरल) २६,२५०/-
२ रिकामे लोखंडी बॅरल (०८ नग) ४,०००/-
३ लोखंडी डबे (१० नग) ४००/-
४ लोखंडी कायल (०१ नग) ५००/-
५ कोळशाची पोती (०२ नग) ५००/-
  एकूण किंमत ३१,६५०/-

आरोपींची नावे 
१) नितेश कुंभार मारवाडी (रा. कंझारभाट वस्ती, कर्नाळ, ता. मिरज, जि. सांगली)
२) संजय कुंभार मारवाडी (रा. कंझारभाट वस्ती, कर्नाळ, ता. मिरज, जि. सांगली)
​सदर आरोपींविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (बी), ६५ (सी), ६५ (डी), ६५ (ई) व ६५ (एफ) अन्वये गुन्हा (गु.र.नं. १५८/२०२६) दाखल करण्यात आला आहे. ​सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना 

बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली:

​पोलीस निरीक्षक: संजीव झाडे (एलसीबी), भैरू तळेकर (सांगली ग्रामीण).
​पोलीस उप-निरीक्षक: महादेव पोवार.
​पोलीस अंमलदार: विक्रम खोत (फिर्यादी), अभिजीत माळकर, अनिल कोळेकर, अतुल माने, महादेव नागणे, संदीप पाटील, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते आणि श्रीधर बागडी यांनी केली आहे.
​पोलीस प्रशासनाचा इशारा:

सांगली जिल्ह्यात अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्या इसमांवर अशीच कठोर स्वरूपाची कारवाई करण्यासाठी 'विशेष मोहीम' तीव्र केली जाणार आहे, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.