Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भ्रष्टाचाराचा 'महामेरू' कोसळणार? बातम्यांच्या धसक्याने प्रवीण अण्णा हतबल; 'एनी हाऊ' बातमी थांबवण्यासाठी धडपड!

भ्रष्टाचाराचा 'महामेरू' कोसळणार? बातम्यांच्या धसक्याने प्रवीण अण्णा हतबल; 'एनी हाऊ' बातमी थांबवण्यासाठी धडपड!

सांगली :- राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचाराचा महामेरू समजल्या जाणाऱ्या प्रवीण अण्णाची सध्या चांगलीच त्रेधातिरपट उडाली आहे. आपल्या काळ्या कारनाम्यांच्या बातम्या प्रसिद्ध होऊ नयेत यासाठी या महाशयांनी आता जंगजंग पछाडण्यास सुरुवात केली असून, खात्याची प्रतिमा मलिन होत असल्याने वरिष्ठ स्तरावरूनही दबाव वाढू लागला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण अण्णांच्या कथित कारनाम्यांमुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग चांगलाच बदनाम झाला आहे. एका बाजूला लायसन्सी धारक आणि दुसऱ्या बाजूला विभागाचे अधिकारी यांच्यातील साटेलोटे उघड होत असल्याने प्रवीण अण्णांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. "काहीही करा, पण बातमी थांबवा" असा आर्त टाहो फोडत अण्णांनी आता अनेकांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली आहे.

हतबल झाले 'अण्णा'!

कधीकाळी दबदबा निर्माण करणाऱ्या या प्रवीण अण्णांसमोर आता 'काय करावे आणि काय नाही' असा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. बातम्यांचे सत्र थांबवण्यासाठी अधिकारी आणि मध्यस्थांकडे त्यांचे हेलपाटे वाढले आहेत. मात्र, सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांमधून होत असलेल्या प्रहारामुळे अण्णांची अवस्था 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशी झाली आहे.

​भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडणार?
आपल्या पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचा डोंगर उभा करणाऱ्या या प्रवीण अण्णांची सध्याची धावपळ पाहता, लवकरच त्यांच्या कारभाराचे मोठे वाभाडे निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. "फोन करा, पण बातमी रोखा" असा ससेमिरा लावणाऱ्या अण्णांना आता जनतेच्या दरबारात उत्तर देणे कठीण झाले आहे. ​येणाऱ्या काळात हा वाद नेमके काय वळण घेतो आणि प्रशासकीय पातळीवर या 'प्रवीण अण्णा'वर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रमश.....






➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.