Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली एलसीबीची जतमध्ये मोठी कारवाई; सराईत चोरटा जेरबंद, दोन गुन्हे उघड

सांगली एलसीबीची जतमध्ये मोठी कारवाई; सराईत चोरटा जेरबंद, दोन गुन्हे उघड


सांगली: सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या सूचनांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने  जत परिसरात धडाकेबाज कारवाई करत एका संशयित आरोपीला जेरबंद केले असून, घरफोडी आणि जबरी चोरीचे दोन गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत.

​सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात

​४ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक संशयित इसम चोरी करून जत ते घाडगेवाडी रोड परिसरात मोटारसायकलवरून फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ३२ एकर प्लाँटींगकडे जाणाऱ्या रोडवर तातडीने सापळा रचला. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या विशाल गारवेल पवार (वय २३ वर्षे, रा. दुधाळ वस्ती, जत) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

सखोल चौकशीत गुन्ह्यांची कबुली
​सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या विशाल पवारची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्याने जिरग्याळ परिसरात केलेल्या दोन गुन्ह्यांची कबुली दिली:

 घरफोडी: गेल्या महिन्यात जिरग्याळ येथील एका घरातून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले होते.

जबरी चोरी: जिरग्याळ गावातीलच एका वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगलसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते.
​सासरा आणि साथीदारांचे कनेक्शन

​तपासादरम्यान समोर आले की, विशालने हे चोरीचे दागिने त्याचा सासरा दत्ता चव्हाण (रा. मधला पारधी तांडा, जत) याला विकण्यासाठी दिले होते. मिळालेल्या पैशांपैकी ३०,०००/- रुपये रोख रक्कम विशाल पवारकडे मिळून आली. या गुन्ह्यात त्याला त्याचा मित्र प्रशांत सिद्धराम हडपद (रा. देवनिबगी, जि. विजापूर) व मेहुणा अभिषेक दत्ता चव्हाण यांनी मदत केल्याचे उघड झाले आहे.

​जप्त केलेला मुद्देमाल
​५०,०००/- रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो पॅशन प्रो मोटारसायकल.
​३०,०००/- रुपये रोख (५०० रुपयांच्या ६० नोटा).

​एकूण मुद्देमाल: ८०,०००/- रुपये.
​यांनी केली कारवाई (तपास पथक)
​ही धडाकेबाज कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, सहाय्यक पोलीस फौजदार अमित परिट, आणि कर्मचारी नागेश खरात, सोमनाथ गुंडे, संदीप नलावडे, सागर लवटे व अनिल कोळेकर यांच्या पथकाने केली. अटक केलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.