Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरकारी शिपायाचा 'काळा' संसार: ३ बायका आणि मेहुणीसह ७ महिलांची फसवणूक; ८ वर्षांपासून सुरू होता भयाण खेळ!

सरकारी शिपायाचा 'काळा' संसार: ३ बायका आणि मेहुणीसह ७ महिलांची फसवणूक; ८ वर्षांपासून सुरू होता भयाण खेळ!



सरकारी कार्यालयातील एक साधा शिपाई काय करू शकतो? याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मागील ८ वर्षांपासून तो सरकारला चुना लावत होता. यातून त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली.

आपल्या तीन बायकांसह सासू, मेहुणी, मेहुण्याची बायको आणि अन्य दोन मैत्रिणींना मालामाल केलं. मात्र आता सात वर्षानंतर या शिपायचं कांड उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. यात आरोपीच्या दोन पत्नींसह सासू, मेहुणी, मेहुण्याची बायको आणि इतर दोन मैत्रिणींचा समावेश आहे.
नेमकं प्रकरण काय?

ही घटना उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील आहे. येथील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने तब्बल ८ कोटी १५ लाख रुपयांचा सरकारी निधी हडपला आहे. या घोटाळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे, आरोपीने हा सर्व पैसा आपल्या तीन पत्नी, मेहुणी, सासू, नातेवाईक आणि महिला मैत्रिणींच्या बँक खात्यात वळवला होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ७ महिलांना अटक केली असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.
साध्या शिपायाने कसा केला 'कोट्यवधींटा' घोटाळा?


इल्हाम शम्सी ऊर्फ रहमान असं या मुख्य आरोपीचं नाव असून तो जिल्हा विद्यालय निरीक्षक (DIOS) कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होता. गेल्या ८ वर्षांपासून तो या कार्यालयात काम करत होता. त्याला कार्यालयातील कामकाजाची सगळी पद्धत माहीत होती. याचाच फायदा घेत त्याने २०१८ पासून या घोटाळ्याला सुरुवात केली. शिक्षकांच्या पगारासाठी येणाऱ्या निधीवर डल्ला मारण्यासाठी त्याने सिस्टीममधील त्रुटींचा फायदा घेतला. त्याने बनावट 'बेनिफिशियरी आयडी' आणि ट्रेझरी टोकन तयार करून सरकारी रक्कम आपल्या जवळच्या लोकांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सुरुवात केली.
तपासात ७ महिलांना बेड्या


बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापकाने खात्यांमधील संशयास्पद व्यवहारांची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलीस अधीक्षक सुकीर्ती माधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने करण्यात आला. तपासादरम्यान ५३ संशयास्पद बँक खाती सापडली आहेत. पोलिसांनी याप्रकरणी ७ महिलांना अटक केली आहे. यात आरोपीच्या दोन पत्नी लुबना आणि अजरा खान, मेहुणी फातिमा, सासू नाहिद, मेहुण्याची बायको आफिया आणि इतर दोन महिला मित्र परवीन खातून आणि आशकारा परवीन यांचा समावेश आहे. यापूर्वी आरोपीची एक पत्नी अर्शी खातून हिला अटक करण्यात आली होती, जी सध्या जामिनावर बाहेर आहे.

अपर पोलीस अधीक्षक विक्रम दहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलांच्या खात्यात एकूण ८ कोटी १५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. त्यापैकी ५ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी गोठवली आहे. घोटाळ्यातून मिळवलेली उर्वरित रक्कम आरोपीनं जमीन खरेदी आणि इतर मालमत्तांमध्ये गुंतवल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.