Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे विषारी दारू प्रकरण: संशयित आरोपी राहुल क्षीरसागरचा मृत्यू; तपास सीआयडीकडे सोपवण्याच्या हालचाली"

पुणे विषारी दारू प्रकरण: संशयित आरोपी राहुल क्षीरसागरचा मृत्यू; तपास सीआयडीकडे सोपवण्याच्या हालचाली"


पुणे विषारी दारू प्रकरणात, दोन वेगवेगळ्या ठिकाणी १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हडपसरमध्ये दारु विक्री करणाऱ्या राहुल याचा दारु पिल्याने मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. त्याच्यावर १३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

राहुल क्षीरसागर असं दारू विक्री करणारा मृत व्यक्तीचं नाव आहे. राहुल क्षीरसागर हा हडपसर परिसरात पांढरे मळा येथे अवैध दारू गुत्ता चालवत होता. त्याच्यावर 13 मे रोजी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दारू विक्री करण्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल होता. याच राहुल क्षीरसागरचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

हडपसर प्रकरणातील मृतांची नावं
राहुल शरद क्षीरसागर (वय ४५), विजय भूकुरलाल शर्मा (वय ४५), अरुण वामन डाडर (वय ६०), तिघेही राहणार पांढरे मळा, सर्वे नंबर २५७, हडपसर, पुणे. तसेच अशोक रमेश चव्हाण व दत्ता माधवराव सुर्यवंशी (वय ५५) राहणार ससाणेनगर अशी मृतांची नावे आहेत.

बुधवारी (ता. २७) रात्री दारू पिऊन आल्यानंतर या सर्वांना मळमळ, डोळ्यांवर अंधारी येणे, तोंडाला फेस येणे व उलट्यांचा त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाले असल्याचे मृतांच्या नातेवाईकांना सांगितले.
तपास सीआयडीकडे?

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारु प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती आहे. दोन्ही शहरात विषारी दारू प्राशन केल्यामुळे १५ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील हडपसर तर पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी येथील अनेक जणांचा यात मृत्यू झाला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.