ब्रेकिंग: लग्नकार्याला गालबोट! पालघरमध्ये वऱ्हाडाचा ट्रक उलटला; १२ जणांचा जागीच मृत्यू, २५ जण मृत्यूशी झुंजत
पालघर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघातझाल्याची घटना घडली आहे. वऱ्हाडाची ट्रक आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मृत्यूच आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
वऱ्हाडाच्या ट्रक मध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी असल्याची माहिती
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. पालघरच्या धानीवरी येथे वऱ्हाडाची ट्रक आणि कंटेनर मध्ये हा भीषण अपघात झाला. वऱ्हाडाच्या ट्रक मध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. वीस ते पंचवीस जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, एकाच वेळी तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.