Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दहावीचा सर्वात 'अजब' निकाल! मार्कशीट पाहून नेटकरी म्हणतायत, "हा तर खरा टॅलेंटेड!"

दहावीचा सर्वात 'अजब' निकाल! मार्कशीट पाहून नेटकरी म्हणतायत, "हा तर खरा टॅलेंटेड!"

दहावीचा निकाल जाहीर होताच गुणवंत विद्यार्थ्यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे.या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.परंतु, अकोले तालुक्यातील राजूर येथील एका विद्यार्थ्याच्या आगळ्यावेगळ्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर,राजूर येथील विद्यार्थी सुशांत मच्छिंद्र रोंगटे याने एसएससी परीक्षेतील सर्वच्या सर्व सहाही विषयांत तंतोतंत 35 गुण मिळवत अनोखा योगायोग साधला आहे.

मित्रमंडळींसह शिक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला

विशेष म्हणजे मराठी,हिंदी,इंग्रजी,गणित,विज्ञान आणि समाजशास्त्र या प्रत्येक विषयात सुशांतला समान गुण मिळाले आहेत.दहावीच्या तणावपूर्ण परीक्षेत प्रत्येक विषयात नेमके पासिंग मार्क मिळणे, हा दुर्मिळ प्रकार मानला जात असून परिसरात त्याची जोरदार चर्चा रंगली आहे."पास व्हायचं तर सगळ्याच विषयांत सारखंच!" असा भन्नाट 'बॅलन्स' साधल्याने मित्रमंडळींसह शिक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.सोशल मीडियावरही सुशांतच्या या निकालाचे विविध विनोदी आणि कौतुकास्पद पोस्ट्स व्हायरल होत आहेत.

सुशांतचा निकाल विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी

गणिताच्या भाषेत बोलायचे झाल्यास सुशांतचा हा निकाल एखाद्या "परफेक्ट स्टॅटिस्टिकल बॅलन्स"सारखा असल्याची चर्चा रंगली आहे. प्रत्येक विषयात समान गुण मिळणे हा केवळ योगायोग नसून विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेही उदाहरण असल्याचे शिक्षकांनी सांगितले.विद्यालय प्रशासनाने सुशांतचे अभिनंदन करत "गुण कमी-जास्त असले तरी जिद्द आणि सातत्य महत्त्वाचे असते,असा संदेश दिला आहे.सुशांतचा निकाल विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे,अशीही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.