Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजब करार! "कौटुंबिक वादातून दोन सख्ख्या बहिणींचा टोकाचा निर्णय; कोर्टातील युक्तिवाद ऐकून न्यायाधीशही थक्क"

अजब करार! "कौटुंबिक वादातून दोन सख्ख्या बहिणींचा टोकाचा निर्णय; कोर्टातील युक्तिवाद ऐकून न्यायाधीशही थक्क"


नात्यांच्या गुंतागुंतीचे अनेक प्रकार समोर येत असतात. मात्र मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर खंडपीठासमोर आलेले प्रकरण ऐकून न्यायमूर्तींपासून वकिलांपर्यंत सर्वच अवाक झाले. दोन सख्या बहिणींनी चक्क आपापल्या पतींची अदला-बदल  करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मोठ्या बहिणीला आपल्या मेहुण्यासोबत (बहिणीचा पती) राहायचे आहे. तर धाकट्या बहिणीने आपल्या भावोजींसोबत (मोठ्या बहिणीचा पती) संसार थाटण्याची तयारी दर्शवली आहे.


दतिया येथील गिरिजा शंकर यांनी आपली पत्नी आणि मुलीचे अपहरण झाल्याची याचिका हायकोर्टात दाखल केली होती. मायाराम नावाच्या व्यक्तीने त्यांचे अपहरण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, जेव्हा पोलिसांनी महिलेला न्यायालयात हजर केले, तेव्हा सत्य काही वेगळेच निघाले. "माझे अपहरण झालेले नाही, मी माझ्या स्वेच्छेने माझ्या मेहुण्यासोबत म्हणजेच मायाराम यांच्यासह राहत आहे," असे प्रतिज्ञापत्र महिलेने दिले. त्यामुळे या प्रकरणात वेगळाच ट्वीस्ट निर्माण झाला.
या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा मायारामच्या पत्नीने (जी याचिकाकर्त्याची मेहुणी आहे) या नात्याला विरोध करण्याऐवजी पाठिंबा दिला. "जर माझ्या बहिणीला माझ्या पतीसोबत राहायचे असेल, तर मला हरकत नाही. उलट, मलाही माझ्या भावोजीं सोबत (याचिकाकर्ता) राहायचे आहे," असे तिने कोर्टात सांगितले. हे ऐकून कोर्ट रूम आवाक झाले. तर या केसची सुनावणी करणारे जज ही चक्रावून गेले. त्यांच्या समोर अशा पद्धतीची अजब-गजब केस पहिल्यांदाच आली होती.
विशेष म्हणजे या दोन्ही बहिणींना मुले आहे. असं असताना ही त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शेवटी हायकोर्टाने ही बाब वैयक्तिक असल्याचं सांगितलं. शिवाय यात अपहरणाचा कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे सांगत Habeas Corpus याचिका फेटाळून लावली. मात्र या घटनेनं सर्वांनाच आवाक केलं. याची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत होती. दोन सख्ख्या बहीणींनी चक्क आपल्या नवऱ्याची आदला बदल केली. तशी इच्छा त्यांनी अगदी न्यायालया समोर बोलून दाखवली. या दोघींनीही आपापल्या संसारातून बाहेर पडून एकमेकींच्या पतींशी लग्न करण्याची संमती दिली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.