जिल्ह्यात अवैध शस्त्रे आणि शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी विशेष पथक तैनात केले होते.
सोमवारी (११ मे) रात्री एलसीबीचे पथक विश्रामबाग परिसरात पेट्रोलिंग करत असताना, पोलीस कॉन्स्टेबल विनायक सनदी आणि संकेत कानडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार गोरखनाथ मारुती कदम (वय ४२, रा. वानलेसवाडी) हा हसनी आश्रम ते कुंभार मळा परिसरात कमरेला पिस्टल लावून थांबलेला आहे.
शाळेच्या परिसरात घातला गराडा
मिळालेल्या माहितीची खात्री पटताच पोलिसांनी खासगी वाहनांनी कुंभार मळा येथील नवचैतन्य प्री-प्रायमरी स्कूल परिसरात वॉच ठेवला. यावेळी संशयित गोरखनाथ कदम तिथे उभा असल्याचे दिसताच, पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेतले.
झडतीमध्ये पिस्टल सापडले
पोलिसांनी पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. या शस्त्राबाबत विचारणा केली असता, त्याने कोणतीही कायदेशीर कागदपत्रे सादर केली नाहीत. प्राथमिक चौकशीत त्याने हे पिस्टल सुरक्षेसाठी मध्य प्रदेशातील सरदार नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतल्याची कबुली दिली.
कारवाईतील मुद्देमाल:
देशी बनावटीचे पिस्टल: किंमत ६०,०००/- रुपयेजिवंत काडतूस: किंमत ५००/- रुपयेएकूण मुद्देमाल: ६०,५००/- रुपयेयाप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा (गु.र.नं. १४१/२०२६) दाखल करण्यात आला आहे. आरोपी गोरखनाथ कदम याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १४ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कार्वेकर करत आहेत.ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पीएसआय महादेव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अमित परीट, संदीप पाटील, अतुल माने, रणजीत जाधव, प्रकाश पाटील, विनायक सनदी, संकेत कानडे, अभिजीत माळकर आणि सायबर पोलीस ठाण्याचे सतीश आलदर, विजय पाटणकर व त्यांच्या टीमने यशस्वी केली. "जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध एलसीबीचे विशेष पथक यापुढेही अशीच कठोर मोहीम राबवणार आहे."— संजीवकुमार झाडे, (पोलीस निरीक्षक, एलसीबी, सांगली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.