पुणे हादरले! ६५ वर्षांच्या नराधमाचं काळजाला पीळ पाडणारं कृत्य; साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून मृतदेह शेणात गाडला!
महाराष्ट्राला हादरून सोडणारी आणि मन सुन्न करणारी घटना पुण्यातील भोर तालुक्यातून समोर आली आहे. भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये साडेतीन वर्षीय चिमुरडीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या केली आहे.
या घटनेनंतर जिल्ह्यात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून गामस्थ आक्रमक झाल्याचे पाहिला मिळाले. मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवून गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनही केलं. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान घटनेच्या निषेधार्थ आज नसरापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडी गोठ्यात नेलं आणि...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडी शाळेला उन्हाळ्याचा सुट्टी लागली म्हणून आजीच्या गावाला आली होती. शुक्रवारी दुपारी नसरापूरमधील राम मंदिराजवळ ही चिमुकली खेळत होती. एका 65 वर्षीय नराधमाने तिला आमिष दाखवलं. त्यानंतर ती जवळ आल्यावर तिला जवळच्या गुरांच्या गोठ्यात घेऊन गेला. तिथे या नराधमाने चिमुरडीवर निर्दयीपणे शारीरिक अत्याचार केला. या विकृत माणूस इथेच थांबला नाहीतर त्याने त्यानंतर तिची निघृणपणे हत्या केली. या चिमुकलीचा मृतदेह कोणाला सापडू नये म्हणून गोठ्यातील शेणामध्ये त्याने तो लपवला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.