Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! फडणवीसांच्या 'त्या' शब्दावर शरद पवार भडकले; म्हणाले, "हे अपेक्षित नव्हतं!"

धक्कादायक! फडणवीसांच्या 'त्या' शब्दावर शरद पवार भडकले; म्हणाले, "हे अपेक्षित नव्हतं!"


पुणे : इंधन बचतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून आवाहन केले. त्या आवाहन अधिक गांभीर्याने घ्यायला हवे. परंतु इंधन बचतीचा निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागला, असा सवाल ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी विचारला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना उद्देशून वापरलेले शब्द वैयक्तिक मला आवडले नसल्याचे सांगत फडणवीस यांच्याबद्दल शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. 

इंधन बचतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशवासियांमध्ये अस्वस्थता असल्याचे अधोरेखित करून शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. देशातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे आणि या बैठकीला स्वत नरेंद्र मोदी यांनी हजर राहून देशातली परिस्थिती सांगितली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राहुल गांधी रिजेक्टेड माल, शरद पवार यांचा संताप
नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राहुल गांधी यांनी त्यांना काही सवाल विचारले तसेच सल्लाही दिला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी यांना देशाच्या राजकारणातील रिजेक्टेड माल असल्याची जहरी टीका केली. देवेंद्र फडणवीस यांचे हेच शब्द शरद पवार यांना अजिबातच रूचले नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलताना भाषेचा स्तर पाळायला हवा. मुख्यमंत्री यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही, असे शरद पवार यांनी सुनावले.

मुख्यमंत्री राहुल गांधी यांना बोलले ते अयोग्य होते. कारण राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तोंडी टिंगल टवाळीची भाषा शोभत नाही. मुख्यमंत्री राहुल गांधी यांना जे बोलले ते मला आवडले नाही, मला वाईट वाटले, असे शरद पवार म्हणाले.
टू व्हिलरवरून प्रवास करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांना शरद पवारांचा सणसणीत टोला

इंधन बचतीच्या पार्श्वभूमीवर कुणी टू व्हीलरवर जातंय, कुणी आपल्या ऑफिसला चालत जातंय, कुणी ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करतंय. एक दोन दिवसांच्या बचतीने होत नसते. दिखावा कमी करून इंधन बचत करा, असा सणसणीत टोला शरद पवार यांनी टू व्हिलरवरून प्रवास करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.