सांगलीत 'दोषी' पॅटर्न! एसी केबिन सोडून पोलीस अधीक्षक थेट रस्त्यावर; गुन्हेगारांचे धाबे दणाणले!
सांगली: सांगली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी पदभार स्वीकारताच आपल्या आक्रमक कार्यशैलीची झलक दाखवण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारांसाठी 'कर्दनकाळ' मानले जाणारे दोषी केवळ कागदी आदेश न देता स्वतः रस्त्यावर उतरल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
केबिनबाहेरचे 'फील्ड' ऑपरेशन
गेल्या काही काळापासून वरिष्ठ पोलीस अधिकारी एसी केबिनमध्येच बसून राहत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याचाच फायदा घेत जिल्ह्यात खून, मटका, स्पा सेंटर्समधील गैरप्रकार, जुगार आणि हातभट्टीच्या धंद्यांनी डोके वर काढले होते. मात्र, नूतन अधीक्षकांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केल्याने आळसावलेले पोलीस दलही आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
जनतेच्या अपेक्षा उंचावल्या
स्वतः पोलीस प्रमुखच रस्त्यावर उतरल्याने सामान्य सांगलीकरांमध्ये आनंदाचे आणि आश्चर्याचे वातावरण आहे. "आता तरी वाढत्या गुन्हेगारीला लगाम बसणार का?" आणि "अवैध धंद्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त होणार का?" असे प्रश्न आता चर्चिले जात आहेत. तुषार दोषी यांच्या या 'धडाकेबाज' सुरुवातीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, जिल्ह्याला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी ते ठोस पावले उचलतील, अशी आशा सांगलीकर व्यक्त करत आहेत.
बदलत्या सांगलीचे चित्र आता पोलीस अधीक्षकांच्या 'ऍक्शन'वर अवलंबून असणार आहे!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.