Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुकानांचा पत्रा उचकटून चोरी करणारा सराईत चोरटा सांगली एलसीबीच्या जाळ्यात; ४ गुन्हे उघड, ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत!

दुकानांचा पत्रा उचकटून चोरी करणारा सराईत चोरटा सांगली एलसीबीच्या जाळ्यात; ४ गुन्हे उघड, ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत!


दुकानांचे पत्रे उचकटून घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल आणि सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून शिराळा, आष्टा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील घरफोडी व मोटारसायकल चोरीचे एकूण ४ गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्याकडून ८०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
​विशाल संभाजी पवार (वय २७, रा. उमराणी, ता. जत, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. ​जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार केले होते.
​दिनांक १७ मे २०२६ रोजी एलसीबीच्या पथकातील पोलीस अंमलदार उदयसिंह माळी यांना खास बातमीदारामार्फत एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. एक संशयित इसम चोरीच्या 'होन्डा शाईन' मोटारसायकलवरून (क्रमांक: MH 09 EC 2243) आष्टा मार्गे सांगलीच्या दिशेने येत असल्याची ती माहिती होती.

​मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलिसांनी फल्ले मंगलकार्यालयासमोरील रोडवर सापळा रचला. सांगलीकडे येणाऱ्या संशयित मोटारसायकलस्वाराला पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे, पळून जाण्याची कोणतीही संधी न देता ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव विशाल संभाजी पवार असल्याचे सांगितले. गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे रोख रक्कम, स्टीलचा पाना आणि मोटारसायकलच्या ४ चाव्या मिळून आल्या.

​पोलिसांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने ती मोटारसायकल महिनाभरापूर्वी जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरून चोरी केल्याचे कबूल केले. तसेच, स्टीलच्या पाण्याचा (टूल) वापर करून आष्टा येथील चहाचे दुकान, शिराळा येथील हॉटेल आणि एका पानटपरीचे पत्रे उचकटून घरफोड्या केल्याची व त्यातूनच ही रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली.
​आरोपीच्या अटकेमुळे खालील ४ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत (सर्व गुन्हे नवीन भारतीय न्याय संहिता - BNS नुसार दाखल आहेत):
​शिराळा पोलीस ठाणे: गु.र.नं. ८५/२०२६ (BNS कलम ३३१(३), ३०५ (अ) प्रमाणे - फिर्यादी: अनिल बाळासाहेब चव्हाण, रा. भटवाडी)
​शिराळा पोलीस ठाणे: गु.र.नं. ८४/२०२६ (BNS कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ (अ), ३३४(१) प्रमाणे)
​आष्टा पोलीस ठाणे: गु.र.नं. ११६/२०२६ (BNS कलम ३३४(१) प्रमाणे)
​जयसिंगपूर पोलीस ठाणे (जि. कोल्हापूर): गु.र.नं. ८१/२०२६ (BNS कलम ३०३(२) प्रमाणे)
​आरोपी विशाल पवार हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही दुकानांचे पत्रे उचकटून चोऱ्या करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील मोटारसायकल, रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले असून, पुढील तपासासाठी त्याला मुद्देमालासह शिराळा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
ही धडक कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली:
​नेतृत्व: पोलीस निरीक्षक संजीव झाडे (स्था.गु.अ. शाखा, सांगली), पोलीस निरीक्षक अंबाजी भोसले, व सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरूटे (शिराळा पो.ठा.).
​एलसीबी पथक: सपोफौ अमित परिट, पोहेकॉ उदयसिंह माळी, संदीप गुरव, अरुण पाटील, मच्छिंद्र बर्डे, सतिश माने, सागर लवटे, प्रकाश पाटील, अमर नरळे, अनिल कोळेकर, दर्याबा बंडगर, संदीप नलावडे, अमिरशा फकीर, नागेश खरात, सागर टिंगरे, महादेव नागणे, पोकॉ सुरज थोरात, रोहन धसले, विक्रम ढोत.

​शिराळा पोलीस ठाणे: पोहेकॉ अमर जाधव, पोकॉ उमेश शेट्टे.
​सायबर पोलीस ठाणे: पोकॉ विजय पाटणकर, करण परदेशी, कॅप्टन गुंडवाडे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.