"विवाहामुळे मिळतो कॅन्सरपासून 'संरक्षणात्मक फायदा'; संशोधनातील महत्त्वाचा निष्कर्ष"
नुकत्याच झालेल्या संशोधनात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामध्ये लग्न न केल्यास कॅन्सरचा धोका वाढतो का? असा प्रश्न चर्चेत आला आहे. Sylvester Comprehensive Cancer Center इथल्या संशोधकांनी जवळपास 40 लाख लोकांच्या डेटाचा अभ्यास करून एक महत्त्वाचा निष्कर्ष मांडलाय.
या संशोधनानुसार, कधीच लग्न न केलेल्या पुरुष आणि महिलांमध्ये कॅन्सरचा धोका विवाहित लोकांच्या तुलनेत जास्त असल्याचं आढळलं आहे.
University of Miami Miller School of Medicine च्या अंतर्गत हे संशोधन करण्यात आले आहे. हे संशोधन Cancer Research Communications या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधनात एचपीव्ही (HPV) संसर्गामुळे होणाऱ्या कॅन्सरचा धोका अविवाहितांमध्ये जास्त असल्याचं दिसून आलं. पुरुषांमध्ये गुदाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण हे पाचपट जास्त आढळलं, तर महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या (सर्व्हायकल) कॅन्सरचं प्रमाण तीनपट जास्त असल्याचं कळालं आहे.
तसेच धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयींमुळे फुफ्फुस आणि अन्ननलिकेच्या कॅन्सरचं प्रमाणही अविवाहितांमध्ये जास्त असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. तसेच पोट, कोलोरेक्टल, लिव्हर, ओव्हेरियन आणि एंडोमेट्रियल कॅन्सरच्या घटनांमध्येही वाढ दिसून आली आहे.
या निष्कर्षांवरून "कॅन्सरपासून वाचण्यासाठी लग्न करणं आवश्यक आहे" असा अर्थ काढणं चुकीचं ठरेल, असं तज्ज्ञ म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, लग्न ही थेट संरक्षण देणारी गोष्ट नाही, त्यामागची सामाजिक, आर्थिक आणि जीवनशैलीशी संबंधित घटक जास्त महत्त्वाचं असतात. विवाहित लोकांमध्ये रोजच्या रोज तपासणे आरोग्य तपासणे, लाइफस्टाइल आणि सामाजिक आधार जास्त असतो. त्यामुळे त्यांचा धोका तुलनेने कमी दिसू शकतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.