Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वारंवार चकरा मारण्यापासून सुटका! सांगली महापालिकेची दिव्यांगांसाठी 'डिजिटल' पाऊलवाट

वारंवार चकरा मारण्यापासून सुटका! सांगली महापालिकेची दिव्यांगांसाठी 'डिजिटल' पाऊलवाट


सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विविध कल्याणकारी योजना आणि उदरनिर्वाह भत्त्याचा लाभ थेट आणि विनाअडथळा मिळण्यासाठी महापालिकेने 'वन-टाइम' ऑनलाईन नोंदणी सुविधा सुरू केली आहे. आयुक्त श्रीम. संजीता महापात्र यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अश्विनी पाटील यांनी या सुविधेचे अनावरण केले. यामुळे दिव्यांगांना आता वारंवार कार्यालयात येऊन हयातीचा दाखला किंवा अर्ज देण्याची गरज भासणार नाही.

​नोंदणीसाठी महत्त्वाचे:
​नोंदणीची मुदत: १ मे २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत.
​अधिकृत लिंक: https://smkc.gov.in:8443/disability-registration
​आवश्यक कागदपत्रे: UDID कार्ड, ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, [आधार कार्ड (redacted)], रेशन कार्ड, बँक पासबुक आणि उत्पन्नाचा दाखला.
​"पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि दिव्यांग बांधवांचा त्रास कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. ३१ ऑगस्टपूर्वी सर्वांनी आपली नोंदणी पूर्ण करावी," असे आवाहन उपायुक्त अश्विनी पाटील यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.