Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जळगाव हादरले! पोलिओ डोस घेताच १० मिनिटांत चिमुरड्याचा अंत; आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणावर संताप

जळगाव हादरले! पोलिओ डोस घेताच १० मिनिटांत चिमुरड्याचा अंत; आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणावर संताप


पोलिओ डोस आणि लस घेतल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत अडीच महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना जळगावच्या चाळीसगावमध्ये घडली. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या मुलीला रात्री उशिरा नेण्यात आले. पण त्याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी गावात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली. दीपक बोरसे यांची अडीच महिन्यांची मुलगी संचिताला जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान पोलिओ डोस आणि लस देण्यात आली होती. पण लस दिल्यानंतर १० मिनिटात तिची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तातडीने तिला चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

मृत्यू झालेल्या मुलीचे वडील दीपक बोरसे हे भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असून सध्या अयोध्या येथे सेवेत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांच्या मदतीने बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. या घटनेमुळे जळगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुलीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नेण्यात आला. रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे मुलीचे आजोबा तुळशीदास मराठे हे अडीच महिन्यांच्या नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन रात्रभर शवविच्छेदन विभागाबाहेर बसून होते. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.