सांगली एलसीबीचा 'ट्रॅप' यशस्वी: १.५ लाखांच्या तीन दुचाकींसह सराईत गुन्हेगार अटकेत.

सांगली, मिरज शहरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटhक करण्यात आली. त्याच्याकडून दीड लाखांची तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

विनायक बजरंग खुटाळे (वय ३२, रा. अभिनंदन कॉलनी, शिदे मळा, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दुचाकी चोरी करणाऱ्यांना अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी एलसीबीला दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांनी चोरट्याना पकडण्यासाठी उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक तयार केले होते.

पथक चोरट्यांचा शोध घेत असताना पथकातील विक्रम खोत यांना एक सराईत गुन्हेगार उद्योग भवन परिसरात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून खुटाळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत कसून चौकशी केल्यावर त्याने शंभर फुटी रस्ता, सांगलीवाडी तसेच मिरजेतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, अमित परिट, अमर नरळे, अमिरशा फकीर, अनिल कोळेकर, संदीप नलावडे, नागेश खरात, सागर लवटे, मछिद्र बर्डे, सागर टिंगरे, विक्रम खोत, सोमनाथ पतंगे, विनायक सुतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.