नाशिकच्या टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हि एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरात आश्रित होती, त्यामुळं मतीन पटेल यांना पोलिसांनी या प्रकरणात आरोपी केले आहे.
परिणामी मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दणका दिलाय, त्यांच्या घरावर आता बुलडोझर कारवाईकरण्यात येत आहे. ज्या घरात निदा खान लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधल्याचा ठपका ठेवतहि तोडाक कारवाई करण्यात येत आहे. एकूणच निदा खानला आश्रय देणं एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलंअसून मतीन पटेल यांचे नगरसेवकपदही धोक्यात आलं आहे.
कारवाई साठी आलेल्या कर्मचाऱ्यांना संविधान देऊन आणि फुल टाकून स्वागत
मिळालेल्यामाहितीनुसार, मतीन पटेल यांनी स्वतःहूनच घर पडायला सुरुवात केली असून कारवाई होण्यापूर्वीच घर रिकामं केलं आहे. निदा खान लपवल्याप्रकरणी महापालिकेने अवैध असलेल्या मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची तयारी केली. त्या आधीच मतीन पटेलच्या वतीने स्वतःचे घर पूर्ण रिकामंकरून सामान घराबाहेरकाढलं आहे. अशातच मतीनच्या घरच्या लोकांनी मनपा पथक अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा कारवाईसाठी आले असताना संविधान देऊन आणि फूल टाकून स्वागत केलं.
कारवाईवेळी मोठा पोलीसबंदोबस्त
दरम्यान, या तोडक कारवाई वेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील बघायला मिळालाआहे. यावेळी 1 डीसीपी, 2 एसीपी,11 पीआय, 15 पीएसआय, एपीआय, 8 महिला पोलीस अधिकारी, 120 पुरुष कर्मचारी, 60 महिला कर्मचारी आणि 100 मनपा कर्मचारी उपस्थित होते.
MIM : दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचा नियम धाब्यावर, नगरसेवकपदही धोक्यात
छत्रपती संभाजीनगरमध्ये नासिक कार्पोरेट जीहाद मधील आरोपी निदा खानला लपवण्यामध्ये एमआयएमच्या नगरसेवक मतीन पटेल याचं नाव समोर आलं आणि पक्ष अडचणीत आला. अशातच आता त्यात आणखीन एक भर पडलीय. एमआयएमच्या आणखी एका नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. मिराज खान जलील खान असं या नगरसेवकाचे नाव आहे. महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवकपद अबाधित ठेवण्यासाठी दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचा नियम धाब्यावर बसवून, स्वतःच्या तिसऱ्या मुलाला सख्ख्या भावाचा मुलगा असल्याचे भासवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी बनावट जन्मदाखला आणि शाळेचे खोटे बोनाफाईड सर्टिफिकेट तयार करून शासनाची आणि मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मेराज खान, त्यांच्या पत्नी, भाऊ, भावजय आणि एका शाळेच्या मुख्याध्यापकासह सात जणांविरुद्ध शहर चौक पोलीस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाऱ्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात पकडण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलाच्या तपासातून या संपूर्ण बनावटगिरीचे बिंग फुटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.