Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​'ती' हसली अन थेट घरीच बसली! मुख्यमंत्री विजय सरकारचा मोठा दणका; IPS रम्या भारती तडकाफडकी निलंबित!

​'ती' हसली अन थेट घरीच बसली! मुख्यमंत्री विजय सरकारचा मोठा दणका; IPS रम्या भारती तडकाफडकी निलंबित!


तामिळनाडूमध्ये एका 10 वर्षीय मुलीचं अपहरण आणि हत्येप्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेत आयपीएस रम्या भारती यांच्यासह इतर दोन IPS अधिकारी हसत असल्याचे दिसून आले. संवेदनशील घटनेच्या पत्रकार परिषदेदरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांचा हा असा असंवेदनशीलपणा दिसून आल्याने सोशल मीडियासह विविध स्तरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. या प्रकारानंतर मुख्यमंत्री विजय जोसेफ  यांनी तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केलीयं. 
अपहरण आणि हत्या प्रकरणाच्या पत्रकार परिषदेदरम्यान, तिन्ही पोलिस अधिकारी हसत असल्याचं दिसून आले. अनेकांनी या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हत्या प्रकरणावर चर्चा करताना अधिकाऱ्यांवर असंवेदनशीलपणाचा आरोप केला. सुलूरमध्ये एका दहा वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये तिन्ही पोलिस अधिकारी असंवेदनशीलपणे हसत असल्याचं दिसून आले आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.
पत्रकार परिषदेत IG राम्या भारती यांच्यासह इतर पोलिस अधिकारी निष्पाप चिमुकलीच्या हत्या प्रकरणाची माहिती माध्यमांसमोर देत होते. एका 10 वर्षीय चिमुकलीचं दोन नराधमांनी अपहरण केलं, तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसून आलं. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांच हसू पीडित मुलीच्या कुटुंबाच्या जखमेवर मीठ नव्हे, तर मसाला चोळल्यासारखी कृती असल्याचा संताप नेटककऱ्यांकडून व्यक्त होताना दिसत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.