Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नीट परीक्षेतील धक्कादायक प्रकार! जॅकेट काढण्यास सांगितल्याने साताऱ्यात विद्यार्थिनीचा संताप, थेट परीक्षेवरच टाकला बहिष्कार!

नीट परीक्षेतील धक्कादायक प्रकार! जॅकेट काढण्यास सांगितल्याने साताऱ्यात विद्यार्थिनीचा संताप, थेट परीक्षेवरच टाकला बहिष्कार!


सातारा : साताऱ्यात रविवारी 'नीट-यूजी' फेरपरीक्षेच्या वेळी एक परीक्षार्थी मुलगी जॅकेट घालून केंद्रावर आली. यावेळी मार्गदर्शक नियमावलीचा आदेश पाळत केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तिला जॅकेट काढण्यास सांगितले. मात्र, मुलीने जॅकेट काढणार नसल्याचे सांगत चक्क परीक्षा देणेच टाळले. या प्रकाराने तिचे पालकही अचंबित झाले. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात रविवारी 'नीट-यूजी' परीक्षा केंद्र होते. सकाळपासूनच केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी अकरा वाजल्यापासून केंद्रावर परीक्षार्थींना तपासून सोडले जात होते. एक मुलगी परीक्षेच्या प्रवेशद्वाराजवळ गेली. तिने कानातील टाॅप्स काढले. त्यानंतर तिला अंगातील जॅकेट काढायला लावले. मात्र, तिने जॅकेट काढायला नकार दिला.

जॅकेट पालकांकडे द्या आणि आतमध्ये या, असे तेथील महिला कर्मचाऱ्यांनी मुलीला सांगितले. परंतु तिने जॅकेट काढण्यास ठाम नकार दिला. तातडीने तिने परीक्षा केंद्र सोडले. तिच्यासोबत आई-वडील होते. दुचाकीवर बसून आई-वडील मुलीला घेऊन घरी गेले.

वडील मुलीवर संतापले
तुला परीक्षाच द्यायची नव्हती का ? तुला माहीत होते ना, जॅकेट घालायचे नाही, असा मुलीवर संताप व्यक्त करीत वडील तेथून निघून गेले. हा सारा प्रकार तेथे आलेले इतर मुलांचे पालक अवाक् होऊन पाहत होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.