Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाकीतले 'ड्रग्ज' कनेक्शन आता संपणार! पोलीस आढळल्यास थेट बडतर्फी, वरिष्ठ निरीक्षकांवरही कोसळणार कारवाईची कुऱ्हाड!

खाकीतले 'ड्रग्ज' कनेक्शन आता संपणार! पोलीस आढळल्यास थेट बडतर्फी, वरिष्ठ निरीक्षकांवरही कोसळणार कारवाईची कुऱ्हाड!


ड्रग्जच्या वारंवार घटना घडणाऱ्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. ड्रग्जमध्ये गुंतलेल्या पोलिसांवर थेट बडतर्फीची कारवाई होईल असेही त्यांनी जाहीर केले. 
शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मुंबईतील अमली पदार्थाची वाढती विक्री व सेवनाकडे सरकारकडे खास करून गृहखात्याचे लक्ष वेधले. मुंबईतच नव्हे तर पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, भिवंडी, अहिल्यानगर, वर्धा, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, जळगाव, मराठवाडय़ातही अमली पदार्थांची विक्री होत आहे. 
मुख्यमंत्र्यांनी 'ड्रग्ज फ्री मुंबई'ची घोषणा केली आहे, पण अमली पदार्थांच्या विक्रीची माहिती दिल्यावरही कारवाई होत नाही. अमली पदार्थ गल्लीबोळात विकले जातात. ड्रग्जविरोधातील झीरो टॉलरन्स अपयशी ठरल्याचे प्रभू यांनी निदर्शनास आणले.

पुनर्वसन केंद्रे वाढवणार
अमली पदार्थांच्या घटनांमध्ये पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप सदस्यांनी केली. त्यावर अमली पदार्थाच्या कोणत्याही घटनांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पोलिसांचा सहभाग आढळून आल्यास त्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येईल. अमली पदार्थविरोधी मोहिमेत पुनर्वसन केंद्रे वाढवण्याची अमिन पटेल यांनी केलेली मागणी मान्य करताना पुनर्वसन केंद्रांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व महानगरपालिकांना आदेश देण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.