Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"जनता 'कॉक्रोच' नाही, सत्ता उलटवून लावेल!" जंतर-मंतरवरून उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर तोफ

​"जनता 'कॉक्रोच' नाही, सत्ता उलटवून लावेल!" जंतर-मंतरवरून उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर तोफ


देशभरात गाजत असलेल्या NEET परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

याच आंदोलनाचा दाखला देत माजी मुख्यमंत्रीमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे हे जाहीर निवेदन सोशल मीडियावर शेअर केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवेदनात विद्यार्थ्यांच्या वेदनांना वाट करून दिली आहे. ते म्हणाले, "ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, देशाचे भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आज आपल्या वेदना आणि भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या जंतरमंतरवर या तरुणांचे आंदोलन सुरू झाले आहे."

'कॉक्रोच' शब्दावरून सरकारवर टीका

आंदोलक तरुणांना 'कॉक्रोच' म्हणून हिणवल्या जाणाऱ्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी निषेध केला आहे. "त्यांना 'कॉक्रोच' म्हणून हिणवणे आणि न्याय नाकारणे चुकीचे आहे. NEET पेपरफुटीमुळे देशातील लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झाला आहे. आज हे सर्व पीडित तरुण-तरुणी न्याय मिळवण्यासाठी आक्रोश करत आहेत," अशी टीका ठाकरेंनी केली.

सरकारला थेट इशारा

केंद्र सरकारला गंभीर इशारा देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारला या पीडित तरुणांचे म्हणणे ऐकावेच लागेल. "कोक्रोच ना कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने सरकारला दिला आहे!" असे म्हणत त्यांनी सरकारला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी ठाकरेंचे हे निवेदन सोशल मीडियावर शेअर केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.