Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गद्दारांना शिवसैनिकांचा हिसका! खासदार आष्टीकर, जाधव, देशमुखांचा रस्ता रोखला; ३९ शिवसैनिकांना अटक केल्याने वातावरण तापलं

गद्दारांना शिवसैनिकांचा हिसका! खासदार आष्टीकर, जाधव, देशमुखांचा रस्ता रोखला; ३९ शिवसैनिकांना अटक केल्याने वातावरण तापलं


गद्दार खासदारांविरोधात शिवसैनिकांचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संताप आता उफाळून आला असून त्यांनी थेट रस्त्यावर उतरून फाईट देण्यास सुरुवात केली आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू हरिभाऊ जाधव, यवतमाळ - वाशिमचे संजय देशमुख या तिघांच्या विरोधात नांदेड विमानतळाबाहेर जोरदार घोषणाबाजी झाली.

तर विमानतळावरून हदगावकडे जात असताना शिवसैनिकांनी रस्त्यातच त्यांचा ताफा अडवून जोरदार निदर्शने केली. सुमारे २०० शिवसैनिक यावेळी आंदोलनासाठी जमले होते. संतप्त शिवसैनिकांनी आष्टीकर यांच्या ताफ्याला धडक देत ‘गद्दार… गद्दार…’ अशा जोरदार घोषणा दिल्या. शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक लक्षात घेता संजय देशमुख यांनी गाडी वळवून पळ काढल्याचे समजते. या आक्रमक आंदोलनानंतर पोलिसांनी ३९ शिवसैनिकांना अटक केली आणि काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार नागेश पाटील आष्टीकर, संजय उर्फ बंडू हरिभाऊ जाधव, खासदार संजय देशमुख हे एकाच विमानाने नांदेड विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर आष्टीकर आणि जाधव हे विमानतळावरून हदगाव मतदारसंघाच्या रस्त्याकडे रवाना झाले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी वाय सुरक्षेसह अनेक गाड्यांच्या ताफ्यासह निघालेल्या आष्टीकर आणि जाधव यांना अर्धापूर जवळील पिंपळगावच्या पाटीजवळ अडवले.

यावेळी जिल्हाप्रमुख बबन बारसे, नांदेड उत्तरचे तालुका प्रमुख सुनील पाटील, मुदखेड चे तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर, दक्षिणचे महानगर प्रमुख मनोज यादव, सिडको शहरप्रमुख अर्जुन ठाकूर पिंटू सूनपे, गजानन गव्हाणे, नवनाथ जोगदंड,परशुराम सावंत, पुरभाजी जाधव,नितीन सरोदे,वकील सावंत,गणपत सोंदे,गिरजाराव पाटील, पप्पू राजेगोरे,शंकर हाफगुंडे, नितीन गिरी, पिंटू बिचे वार, अमोल गुंजकरसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी तणावपूर्ण परिस्थिती पाहता पोलिसांनी ३९ आक्रमक शिवसैनिकांना ताब्यात घेत त्यांना अटक केली त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.