पेढा की विष? पुण्यात नवीन गाडी घेतल्याचा आनंद पेढ्याने हिरावला; ७ जण थेट आयसीयूमध्ये दाखल!
पुणे: पुण्यातील स्वारगेट परिसरात शनिवारी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत आक्रमक पवित्रा घेत एकापाठोपाठ एक दुकानांवर धाडी टाकल्या. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे बस स्थानक परिसर आणि आसपासच्या खाद्यविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही कारवाई सुरू असतानाच, एका मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या पेढ्यांमुळे संपूर्ण कुटुंबाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका स्थानिक कुटुंबाने नवीन गाडी घेतल्याच्या आनंदात पेढे आणले होते. आनंदाचा हा क्षण काही तासांतच दुःखात बदलला. पेढे खाल्लेल्या ७ सदस्यांना तातडीने मळमळ, उलटी आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. पीडितांमध्ये २ निष्पाप बालकांचाही समावेश असल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सर्व रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संबंधित मिठाईच्या दुकानाची पाहणी केली आणि विक्रीसाठी ठेवलेल्या पेढ्यांचे नमुने जप्त केले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अन्नातील भेसळ किंवा निकृष्ट साठवणूक हेच या विषबाधेचे प्राथमिक कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकाराची कडक नोंद घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.