Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टीईटी परीक्षेत दुपट्टा, बुरख्याला बंदी, राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

टीईटी परीक्षेत दुपट्टा, बुरख्याला बंदी, राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या 28 जून रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET परीक्षा) घेतली जाणार असून राज्यातील 6 लाख 125 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यंदा परीक्षेदरम्यान नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असून उमेदवारांना परीक्षा केंद्रात दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी यापैकी काहीही घालता येणार नाही. परीक्षा केंद्रात मोबाईल, पेजर, डिजिटल घडय़ाळ, पेन असे कोणतेही इलेक्ट्रिक साहित्य घेऊन जाता येणार नाही. परीक्षा सुरू होण्यापूर्वी दोन तास आधी सर्व उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी केले आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे 37 जिह्यांतील 1729 परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेबाबतची सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली असून 14 हजार 568 वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. सर्व परीक्षार्थींनी पेपर क्रमांक 1 ला सकाळी साडेआठ वाजता व पेपर क्रमांक 2 ला साडेबारा वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. सकाळच्या सत्रातील पेपर 1 ला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनंतर आणि पेपर क्रमांक 2 ला दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनंतर कुणालाही परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे बेडसे यांनी स्पष्ट केले आहे. 

परीक्षा केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी प्रत्येक परीक्षार्थ्याची हॅण्डबॅग मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने तपासणी केली जाणार आहे. बायोमेट्रिक घेतले जाणार आहे. प्रत्येक परीक्षार्थ्याचे फेस रिकॅग्निशन केले जाणार आहे. ओळखपत्राच्या मूळ डेटाबेसशी साधर्म्य असणाऱया उमेदवारास प्रवेश दिला जाणार आहे. काही वेळा मूळ डेटाबेसशी विद्यार्थ्यांचे फेस रेकग्निशन माहिती न जुळल्यास परीक्षा केंद्र संचालकांनी प्रत्यक्ष व्यक्ती, त्याचे आय कार्ड, प्रवेश पत्रावरील फोटो याची खातरजमा करून ओळख पटल्यानंतर त्या परीक्षार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश द्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.