Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तासगावात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; दोन दुचाकी चोरांसह एका बाल अपचाऱ्याला अटक, ५ मोटारसायकली जप्त!

तासगावात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; दोन दुचाकी चोरांसह एका बाल अपचाऱ्याला अटक, ५ मोटारसायकली जप्त!


तासगाव: सांगली जिल्ह्यामध्ये वाढत्या वाहन चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) तासगाव परिसरात एक मोठी कारवाई केली आहे. तासगाव-गोटेवाडी रस्त्यावरील एम. एम. पार्कजवळ सापळा रचून पोलिसांनी दोन अट्टल दुचाकी चोरांना आणि एका विधीसंघर्ष बालकाला (बालअपचारी) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल २,५०,०००/- रुपये किमतीच्या ५ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) ऋतुराज कुमार मंडले (वय १९ वर्षे, रा. पेठ बिरोबा नगर, तासगाव, जि. सांगली)
२) अनिकेत संजय चव्हाण (वय १९ वर्षे, रा. पेठ बिरोबा नगर, तासगाव, जि. सांगली)
३) एक विधीसंघर्ष बालक (बालअपचारी)

​स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार सागर टिंगरे आणि दरिबा बंडगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. तासगाव ते गोटेवाडी रोडवरील एम. एम. पार्कजवळ तीन तरुण चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी येणार असल्याची ती माहिती होती. 

​मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी एम. एम. पार्क परिसरात पाळत ठेवली. यावेळी बिना नंबर प्लेटच्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर दुचाकीसह तीन संशयास्पद तरुण तिथे थांबलेले दिसले. पोलिसांनी कोणतीही संधी न देता अत्यंत चाणाक्षपणे या तिघांनाही वेढा घालून ताब्यात घेतले.
गुन्ह्याची कबुली आणि ४ गुन्हे उघड:

​ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे सुरुवातीला गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलीस अंमलदार सागर टिंगरे यांनी आरोपी अनिकेत चव्हाण याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने ही दुचाकी १५ दिवसांपूर्वी तासगावमधून चोरल्याची कबुली दिली.
त्यानंतर केलेल्या अधिक तपासात, आरोपींनी सावळज, विटा, पळशी आणि हिवरे या भागातून आणखी ४ मोटारसायकली चोरून त्या एम. एम. पार्कच्या कमानीच्या आडोशाला लपवून ठेवल्याचे कबूल केले. पोलिसांनी तात्काळ पंचांसमक्ष हिरो कंपनीच्या स्प्लेंडर मॉडेलच्या ५ काळ्या रंगाच्या मोटारसायकली (किंमत रु. २,५०,०००/-) जप्त केल्या.

​या कारवाईमुळे खालील ४ गुन्हे उघडकीस आले आहेत:
​तासगाव पोलीस ठाणे - गु.र.नं. २७७/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०३(२))
​तासगाव पोलीस ठाणे - गु.र.नं. २७८/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०३(२))
​विटा पोलीस ठाणे - गु.र.नं. २३८/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०३(२))
​तासगाव पोलीस ठाणे - गु.र.नं. ८१७/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०३(२))
​सदरची उल्लेखनीय कामगिरी सांगलीचे पोलीस अधीक्षक मा. श्री. तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस अंमलदार सागर टिंगरे, दरिबा बंडगर, प्रकाश पाटील, अतुल माने, नागेश खरात, सतीश माने, मच्छिद्र बर्डे, अमर नरळे, अनिल कोळेकर, सागर लवटे, संदीप नलावडे, अमिरशा फकीर, मोतीराम खोत, विक्रम खोत, महादेव नागणे आणि सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे. ​पुढील तपासासाठी जप्त मुद्देमालासह आरोपींना तासगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, बालअपचाऱ्याला त्याच्या नातेवाईकांसह हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.