Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या कायदा-सुव्यवस्थेवरून खासदार विशाल पाटलांचा पालकमंत्र्यांवर थेट हल्ला; "गुंडगिरी आणि पोलिसांच्या सेटलमेंट्सवर लक्ष द्या!"

सांगलीच्या कायदा-सुव्यवस्थेवरून खासदार विशाल पाटलांचा पालकमंत्र्यांवर थेट हल्ला; "गुंडगिरी आणि पोलिसांच्या सेटलमेंट्सवर लक्ष द्या!"


सांगली जिल्ह्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून नवनियुक्त खासदार विशाल पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. भाजपच्या तथाकथित विकासाच्या गप्पा मारण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी सांगलीतील वाढते खून, उघड माथ्याने फिरणारे गुंड आणि गुन्हेगारांशी ‘सेटलमेंट’ करण्यात मग्न असलेल्या पोलिसांवर आधी लक्ष केंद्रित करावे, असा थेट आणि आक्रमक हल्ला खासदार विशाल पाटील यांनी चढवला आहे.

​गेल्या काही दिवसांत सांगली आणि परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार पाटील म्हणाले की, "जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील हे सांगलीच्या मुख्य प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. शहरात गुंडगिरी उफाळून आली आहे, दिवसाढवळ्या खून होत आहेत आणि सर्वसामान्य जनता दहशतीखाली आहे. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासन गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याऐवजी 'सेटलमेंट'च्या राजकारणात व्यग्र असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला." 

​"पालकमंत्र्यांनी केवळ विकासाचा आव आणण्यापेक्षा सांगलीची जनता सुरक्षित कशी राहील याला प्राधान्य द्यावे. जिल्ह्यातील पोलीस खात्याला सुतासारखे सरळ करून गुंडांचा बंदोबस्त करावा, अन्यथा जनता या निष्क्रियतेचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही," असा इशाराही खासदार विशाल पाटील यांनी दिला आहे. या आक्रमक पवित्र्यामुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.