Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! 'त्या' दोन रक्तपेढ्यांवर FDA ची धडक कारवाई, सर्व सेवा तत्काळ बंद

तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! 'त्या' दोन रक्तपेढ्यांवर FDA ची धडक कारवाई, सर्व सेवा तत्काळ बंद


धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून जबाबदारी घेतल्यापासून राज्यातील अवैध धंदेवाले आणि गुटखा माफियांसह भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अशातच तुकाराम मुंढे त्यांच्या नेतृत्वातील अन्न व औषध प्रशासने आपला मोर्चा आता रक्तपेढ्यांकडे वळवत दोन रक्तपेढ्यांना मोठा धक्का दिला आहे.
जे. जे. महानगर रक्तपेढी आणि बदलापूर येथील माया ब्लड बँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे FDA च्या या धडक कारवाईने दोन्ही रक्तपेढ्यांमधील रक्तसंकलनापासून वितरणापर्यंत सर्व सेवा बंद ठेवाव्या लागणार आहेत. जे. जे. महानगर रक्तपेढी आणि बदलापूर येथील माया ब्लड बँकेतील रक्तसंकलन, साठवण, तपासणी, गुणवत्ता नियंत्रण आणि अभिलेख ठेवण्यासंदर्भातील तक्रारी अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्या होत्या. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
तर दोन्ही रक्तपेढ्यांमधील रक्तघटक निर्मिती, परीक्षण, साठवणूक, वितरण, विक्री, रक्तदान शिबिरांचे आयोजन तसेच रक्तपेढीशी संबंधित सर्व प्रकारचे कामकाज पुढील आदेशापर्यंत तात्काळ बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.
या तक्रारीनंतर FDA आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या पथकाने दोन्ही रक्तपेढ्यांची तपासणी केली. यावेळी जे. जे. रक्तपेढीमध्ये रक्तसंकलन, साठवण, तपासणी, गुणवत्ता नियंत्रण आणि अभिलेख ठेवण्यांमध्ये त्रुटी आढळल्या. तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचेही आढळून आल्याने ही कारवाई केली आहे.

तर माया ब्लड सेंटरमध्ये रक्तदान शिबिरांमधून संकलित रक्ताच्या वाहतुकीसंदर्भातील आवश्यक नोंदी, उपकरणांचे कालबाह्य प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण चाचण्यांचा अभाव, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनातील अनियमितता, रक्तदान शिबिरांसाठी आवश्यक मंजुरी व अभिलेखांचा अभाव आढळल्याने विभागाने कारवाई केली.
दरम्यान या कारवाईनंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी, रक्त ही जीवनरक्षक बाब असून त्याच्या संकलन, प्रक्रिया व वितरणामध्ये सुरक्षितता व पारदर्शकता राखणे अत्यावश्यक आहे. पण अशा पद्धतीने रक्तदाता आणि रुग्णांच्या आरोग्याशी निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. रक्तपेढ्यांनी कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.