Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​'शर्टची बाही' वर करून लाच घेणारी महिला अधिकारी ACB च्या जाळ्यात; २० हजारांसाठी झाली रंगेहाथ अटक!

​'शर्टची बाही' वर करून लाच घेणारी महिला अधिकारी ACB च्या जाळ्यात; २० हजारांसाठी झाली रंगेहाथ अटक!

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका अत्यंत धक्कादायक लाचखोरीच्या प्रकरणाने शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी (वर्ग 1) साधना सदाशिवराव बांगर आणि त्यांचा कंत्राटी लिपिक पठाण मुजीब खान यासीन खान यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.

या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराने डिसेंबर 2025 ते मे 2026 या कालावधीत प्राधिकरणाला भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करून दिली होती. या कामाचे एकूण 1,334,851 रुपये इतके बिल झाले होते, त्यापैकी 324,840 रुपयांची रक्कम अद्याप प्रलंबित होती. हे थकीत बिल मंजूर करण्यासाठी साधना बांगर यांनी बिलाच्या 5 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. यानुसार 20,000 रुपयांची लाच ठरली होती. तक्रारदाराने याबाबत जालना एसीबीकडे धाव घेतली.

लाचखोर आरोपींना कोणतीही चाहूल लागू नये, यासाठी एसीबीने अत्यंत सावधगिरीने सापळा रचला होता. पोलीस निरीक्षक कोमल शिंदे या कारवाईच्या अर्धा तास आधीपासूनच कार्यालयातील वॉशरूममध्ये दबा धरून बसल्या होत्या. जेव्हा तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे 20,000 रुपये लिपिक पठाण याच्याकडे दिले, तेव्हा तक्रारदाराने शर्टची बाही वर करून पोलिसांना पूर्वसंकेत दिला. हा इशारा मिळताच पोलीस निरीक्षक शिंदे आणि साध्या वेशातील एसीबीच्या पथकाने धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींची झडती घेतली असता, साधना बांगर यांच्याकडून मोबाईल, टॅब आणि पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, एसीबीकडून अधिक तपास सुरु आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.