🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विद्यार्थी आंदोलनादरम्यान AK 47 ने गोळीबार करणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्याचे निलंबन

विद्यार्थी आंदोलनादरम्यान AK 47 ने गोळीबार करणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्याचे निलंबन

नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात देशभरात विद्यार्थी आंदोलन करत असून शनिवारी बिहार बंदची हाक देण्यात आली. यावेळी झालेल्या उग्र आंदोलनादरम्यान एका जवानाने सिवानमध्ये AK-47 रायफलमधून हवेत गोळीबार केला होता.

याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यावर विरोधकांनी संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान आता त्या पोलिसावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस मुख्यालयाने याची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केले आहे. अभिषेक पटेल (SIT पथकात कार्यरत) असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलक सिवानच्या गांधी मैदानात जमा झाले होते. नंतर या आंदोलनाने उग्र रूप धारण केले. गोंधळ अधिक वाढत गेल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवले. याच गोंधळादरम्यान, एका जवानाने AK-47 मधून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, ज्यानंतर तातडीने विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले.

प्राथमिक चौकशीत जवानाची ओळख पटल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले असून, चौकशीदरम्यान अन्य कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याची चुकीची भूमिका समोर आल्यास त्याच्यावरही नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.