Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चिमुरड्याच्या रक्ताचा थेंब न थेंब हिशोब! दीड वर्षाच्या बाळाला आपटून मारणाऱ्या नराधमाला फाशी; ४० दिवसांत खाक्या!

चिमुरड्याच्या रक्ताचा थेंब न थेंब हिशोब! दीड वर्षाच्या बाळाला आपटून मारणाऱ्या नराधमाला फाशी; ४० दिवसांत खाक्या!

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात दीड वर्षांच्या आरव या चिमुकल्याच्या निर्घृण हत्या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने आरोपी विराज ऊर्फ जितेंद्र पाठक याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

विशेष म्हणजे पोलिसांनी या प्रकरणात अवघ्या ६ दिवसांत आरोपपत्र दाखल केले होते आणि न्यायालयाने घटना घडल्यापासून केवळ ४० दिवसांच्या आतच हा निकाल दिला आहे.

काय आहे प्रकरण?

ही हृदयद्रावक घटना याच वर्षी ३० मे रोजी फिरोजाबादमधील शिकोहाबाद येथील यादव कॉलनीत घडली होती. बदायूं येथील रहिवासी असलेल्या विराजने दीड वर्षांच्या निष्पाप आरवला रस्त्यावर वारंवार आपटून अत्यंत निर्घृणपणे त्याची हत्या केली होती. या अमानुष घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते.

या प्रकरणाची सुनावणी अत्यंत वेगाने पार पडली. शासकीय वकील राजीव प्रियदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या ६ दिवसांत आरोपीविरुद्ध भक्कम पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केले. यामुळे खटल्याची सुनावणी जलद गतीने पुढे गेली.

सरकारी पक्षाने न्यायालयात एकूण १३ साक्षीदार उभे केले, ज्यांनी प्रकरणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर मांडले. दुसरीकडे बचाव पक्षाकडून केवळ एकच साक्षीदार हजर करण्यात आला. गुरुवारी अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी कडक पोलीस बंदोबस्तात आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. सर्व साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांची सखोल तपासणी केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला सर्वात कठोर, म्हणजेच फाशीची शिक्षा सुनावली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.