Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमिर खानचा सर्वात मोठा निर्णय! तिसऱ्या लग्नानंतर 'या' मोठ्या घरात तिन्ही पत्नींसोबत एकत्र राहणार? मुंबईत चर्चांना उधाण!

आमिर खानचा सर्वात मोठा निर्णय! तिसऱ्या लग्नानंतर 'या' मोठ्या घरात तिन्ही पत्नींसोबत एकत्र राहणार? मुंबईत चर्चांना उधाण!

बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. नुकताच आमिर खान याने तिसरे लग्न केले. या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओही पुढे आले. आमिर खान याने तिसरे लग्न गौरीसोबत केले. मागील अनेक वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात मैत्री होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करत थेट लग्न केले. लग्नानंतर गाैरी स्प्रेटसोबत आमिर खानने आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केली. तिसरे लग्न करताच आमिर खान याने मोठा निर्णय घेत 100 करोड रूपये रक्कम देत थेट नवीन घराची बुकिंग केली. अॅडवान्स रक्कम 100 करोड आमिर खानने दिली. विशेष म्हणजे या नवीन आलिशान घरात आमिर खान हा फक्त तिसरी पत्नी गाैरी हिच्यासोबतच राहणार नाही तर पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीसोबतही एकाच छताखाली राहणार आहे.

फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, आमिर खान आणि गाैरी यांचे नवीन हे घर मुंबईच्या खार परिसरात असणार आहे. सध्या लग्नानंतर गाैरीसोबत आमिर खान हा पालीतील विलनोमोना बिल्डिंगमध्ये राहत आहे. यूनियम पार्कमधील मरीन अपार्टमेंट्समध्ये नवीन पत्ता आमिर खानचा आहे. या घरात तो आपल्या तिन्ही पत्नी आणि मुलांसोबत राहणार आहे. ही इमारत 2030 पर्यंत पुर्ण होईल.

या टावर्समध्येयाने एक डझनच्या आसपास फ्लॅट खरेदी केली आहेत. मरीना टॉवर्सचे बांधकाम सध्या सुरू आहे. या इमारतीमध्ये तीन मजले आमिर खान याची पत्नी गाैरी स्प्रेट आणि तिचा मुलगा क्विन राहणार आहेत. या इमारतीमध्ये आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता आणि मुलगा जुनैद एका फ्लोरवर राहतील. त्यांच्यासाठी स्वतंत्र फ्लोर असेल.

यासोबतच आमिर खानची दुसरी पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद राव खान यांच्यासाठीही एक स्वतंत्र फ्लोर असेल. आमिर खान याची आई जीनत हुसेन आणि दोन्ही बहिणी निखत आणि फरत यांच्यासाठीही खास फ्लोर या इमारतीमध्ये असणार आहे. सध्या आमिर खान हा दोन्ही मुले, आई आणि पत्नी गाैरी याच्यासोबत विल्नोमोना बिल्डिंगमध्ये राहत आहे. पूर्ण कुटुंब आलिशान टॉवरमध्ये 2030 मध्ये शिफ्ट होईल. सर्व कुटुंब एकत्र राहावे, याकरिता हा मोठा निर्णय आमिर खानने घेतल्याचे कळतंय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.