हैदराबाद: सॉफ्टवेअर इंजिनीअर तेजस्विनीनं जीव दिल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील गूढ वाढत चाललं आहे. मेडिपल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तेजस्विनीची आई अरुणा यांची चौकशी करण्यात आली आहे. तेजस्विनीची मनस्थिती नेमकी काय होती, तिला काही मानसिक त्रास होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी कपडे काढून जवळच असलेल्या एका मंदिराच्या दिशेनं धावली. तिथून तिनं देवी अम्मावारुची मूर्ती उचलली. यानंतर ती जवळच असलेल्या एका तलावाकडे गेली. याच मूर्तीसह तिनं तलावात उडी घेतली. तेजस्विनीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यात घडली आहे.या प्रकरणाचा तपास पोलिसांनी बंद केला होता. आत्महत्येची सामान्य घटना असं समजून तपास बंद करण्यात आला. पण मंदिरातील मूर्ती गायब असल्याचं लक्षात येताच या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं. पोलिसांनी मूर्तीचा शोध सुरू केला. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यात धक्कादायक दृश्य दिसलं. यातून तरुणीची आत्महत्या आणि मंदिरात झालेली चोरी, अशा दोन्हींचा उलगडा झाला.तेजस्विनी मृत्यूच्या आधी मंदिरात गेली होती. त्यावेळी ती निर्वस्त्र अवस्थेत होती. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्याच अवस्थेत ती मंदिरात गेली. तिथून तिनं देवी अम्मावरुची मूर्ती उचलली. यानंतर ती जवळच असलेल्या तलावाजवळ गेली. मूर्ती घेऊन तिनं तलावात उडी घेतली. यानंतर तेजस्विनीचं शव सापडलं. पण मूर्ती अद्यापही गायब आहे.डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सनं तलावातून मूर्ती शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकरणाच्या तपासात मूर्ती हा महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता असल्याचं तपासकर्त्यांना वाटतं. या प्रकरणी पोलिसांनी तेजस्विनीची आई अरुणाची चौकशी केली आहे. तेसस्विनीच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घडामोडी जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
तेजस्विनी एका फ्लॅटमध्ये भाड्यानं राहत होती. त्या फ्लॅटचं भाडं १ लाख रुपये होतं, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. तेजस्विनी वास्तव्यास असलेल्या इमारतीमधील शेवटच्या दोन मजल्यांचा वापर लॉज म्हणून केला जात होता, अशी माहिती पोलिसांच्या हाची लागली आहे. या माहितीचा तेजस्विनीच्या मृत्यूशी काही संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.