Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इंडियन ओव्हरसीज बँकेत ७५० जागांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया

इंडियन ओव्हरसीज बँकेत ७५० जागांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया


जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकेत नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) देशभरात ७५० अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. 
या भरतीसाठीची अर्जप्रक्रिया ७ जुलै २०२६ पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना २० जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या भरती मोहिमेद्वारे देशभरात एकूण ७५० पदे भरली जातील. यामध्ये सर्वाधिक २०० पदे तामिळनाडूमध्ये आहेत. याशिवाय महाराष्ट्रात ८५, उत्तर प्रदेशात ११०, दिल्लीत ५३ आणि बिहारमध्ये ३५ पदांवर भरती केली जाईल. वेगवेगळ्या राज्यांसाठी पदांची संख्या वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.
वयोमर्यादा काय असेल?

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असणे आवश्यक आहे. यामध्ये वयाची गणना १ जुलै २०२६ या तारखेच्या आधारे केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क

प्रवर्गानुसार अर्ज शुल्क खालीलप्रमाणे ठरवण्यात आले असून सामान्य प्रवर्गाला ९४४ रू ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ७०८ रू तसेच एससी, एसटी आणि दिव्यांग २३६ रु भरावे लागेल.

निवड प्रक्रिया कशी होणार?
या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या (Written Exam) आधारे केली जाईल. परीक्षेत जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲप्टिट्यूड, कॉम्प्युटर नॉलेज आणि संबंधित विषयांवर आधारित एकूण १०० प्रश्न विचारले जातील. या परीक्षेतील कामगिरीच्या आधारेच उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
मानधन (Stipend) किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंगदरम्यान दरमहा खालीलप्रमाणे स्टायपेंड (मानधन) दिले जाईल:

मेट्रो (Metro) शाखा: ₹ १५,५००/- प्रति महिना
शहरी (Urban) शाखा: ₹ १४,५००/- प्रति महिना
निमशहरी किंवा ग्रामीण (Semi-Urban/Rural) शाखा: ₹ १४,०००/- प्रति महिना

अर्ज कसा करावा?
१. सर्वप्रथम इंडियन ओव्हरसीज बँकेच्या अधिकृत वेबसाईट www.iob.in वर जा.

२. होम पेजवर ‘Careers’ विभागात Apprentice Recruitment 2026 या लिंकवर क्लिक करा.

३. तुमची नोंदणी (Registration) करा आणि अर्ज फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक भरा.

४. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी (Signature) स्कॅन करून अपलोड करा.

५. तुमच्या प्रवर्गाचे अर्ज शुल्क ऑनलाईन जमा करून फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआऊट काढून जतन करून ठेवा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.