Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इंडियन ऑइलमध्ये १,५२४ जागांची मेगाभरती; १० वी, आयटीआय आणि पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी!

इंडियन ऑइलमध्ये १,५२४ जागांची मेगाभरती; १० वी, आयटीआय आणि पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी!


सरकारी कंपनीत करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) सुवर्णसंधी आणली आहे. देशातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या आयओसीएलने आपल्या मथुरा, पारादीप, गुजरात आणि बोंगाईगाव रिफाइनरीमध्ये एकूण १,५२४ अप्रेंटिस पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये ट्रेड, टेक्निशियन आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ जून २०२६ पासून सुरू झाली असून २८ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येईल.

चार मोठ्या रिफाइनरींमधील जागांचा तपशील

गुजरात रिफाइनरी: ६४७ जागा

पारादीप रिफाइनरी: ५८२ जागा

मथुरा रिफाइनरी: १५१ जागा

बोंगाईगाव रिफाइनरी: १४४ जागा

शैक्षणिक पात्रता
टेक्निशियन अप्रेंटिस : गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा इंडस्ट्रियल केमिस्ट्रीसह ३ वर्षांची बी.एस्सी. (B.Sc.) पदवी.

ट्रेड अप्रेंटिस : १० वी उत्तीर्ण आणि फिटर ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र.

इंजिनिअरिंग डिप्लोमा : केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा.

इतर पदे: सेक्रेटेरियल असिस्टंटसाठी पदवी (BA/B.Sc/B.Com), अकाउंटंटसाठी बी.कॉम आणि डेटा एंट्री ऑपरेटरसाठी १२ वी उत्तीर्ण आवश्यक.
महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू: २९ जून २०२६ (सकाळी १० वाजल्यापासून)

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २८ जुलै २०२६ (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)

शॉर्टलिस्ट जाहीर होणार: ५ ऑगस्ट २०२६

कागदपत्र पडताळणी (DV): ११ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२६

अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी NAPS किंवा NATS या अधिकृत पोर्टलवर नोंदणी (Registration) करणे बंधनकारक आहे. या नोंदणीशिवाय अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पोर्टलवर लॉगिन करून अर्ज भरल्यानंतर, उमेदवारांना एक अतिरिक्त ‘गुगल फॉर्म’ किंवा ‘एमएस फॉर्म’ देखील भरावा लागेल. निवड प्रक्रिया पूर्णपणे कागदपत्र पडताळणीवर आधारित असेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.