Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खळबळजनक! संभाजीनगरमध्ये 'डॉन'च्या घरावर छापा; पोलिसांच्या हाती लागलेलं 'घबाड' पाहून सगळेच चक्रावले!

खळबळजनक! संभाजीनगरमध्ये 'डॉन'च्या घरावर छापा; पोलिसांच्या हाती लागलेलं 'घबाड' पाहून सगळेच चक्रावले!


शहरात 90 च्या दशकात बाबा फरजान डॉनची मोठी दहशत होती. मिटमिटा, सिटी चौकात त्याचा दबदबा होता. त्याचे गेल्याच महिन्यात निधन झाले. या डॉनच्या मिटमिटा येथील आलिशान बंगल्यावर आज भल्या पहाटेच गुन्हे शाखेने छापा घातला.

पहाटे पाच वाजता झालेल्या कारवाईत पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले. 21 तास पोलीस या बंगल्यात तळ ठोकून होते. पोलिसांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता मिळाली. तर सोन्यासह इतर दागिनेही हस्तगत  करण्यात आल्याचे समजते.

नोटा मोजण्यासाठी पाच मशीन
शुक्रवारी भल्या पहाटेच गुन्हे शाखेने मिटमिटा परिसरातील डॉनच्या बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई 21 तास चालली. मध्यरात्री कारवाई संपली. दोन खोल्यांमध्ये बेहिशोबी रोकड आढळून आली. नोटा मोजण्यासाठी पोलिसांना पाच मशीन आणाव्या लागल्या. 500 रुपयांच्या नोटांची बंडलं पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईवेळी गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते.
घातक शस्त्रे ही जप्त

कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीचे दागिने आणि घातक शस्त्रही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व घडामोडींचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. या डॉनचे महिन्याभरापूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यासाठी मोठी गोपनीयता राखण्यात आली होती. पोलिसांनी अगोदर दोन विश्वासून कर्मचाऱ्यांना अगोदरच ताब्यात घेतले होते. या कारवाईने गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

काय काय आढळले
शुक्रवारी पहाटे 4 वाजल्यापासून दिवसभर सुरू होती कारवाई; शहर पोलीस, गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती.

पडेगाव-मिटमिटा परिसरातील सुमारे एक एकर परिसरातील बंगल्याची सखोल झडती.
झडतीत 5 कोटींची रोकड, 21 लाखांचे सोन्याचे दागिने, 8 लाखांची चांदी जप्त झाल्याची माहिती.

4 रायफल, सुमारे 500 जिवंत काडतुसे, तलवारी आणि चाकू आढळल्याची माहिती.

रोकड मोजण्यासाठी 5 काउंटिंग मशीन मागवण्यात आल्याची माहिती



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.