सिंधुदुर्ग: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि मुंबई महापालिकेतील ठाकरे सेनेचा विद्यमान नगरसेवक गितेश विनायक राऊत, तसंच कुटुंबातील अन्य सदस्य आणि तीन कथित भोंदूबाबांविरोधात ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांची सून गिरीजा राऊत यांनीच हे गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सून गिरीजा गितेश राऊत यांनीच आपला पती गितेश विनायक राऊत ,सासरे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत, सासू शामल विनायक राऊत आणि इतर नातेवाईकांविरोधात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. लग्न ठरवताना खोटी माहिती देऊन फसवणूक करण्यात आली, चांगली नोकरी सोडण्यास भाग पाडण्यात आले, लग्नानंतर पतीने वैवाहिक संबंध टाळले, त्याबाबत विचारणा केल्यावर मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ करण्यात आला, असं आरोप तक्रारीत नमूद आहेत.
अघोरी प्रकार करण्यात आल्याचा गंभीर आरोप
धक्कादायक म्हणजे, पती गितेश विनायक राऊत यांने महिलेवरच "करणी" किंवा "बाहेरची बाधा" असल्याचे सांगून तिला अंधश्रद्धेच्या नावाखाली विविध ठिकाणी नेण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज बाबा, कुडाळ तालुक्यातील नानेली येथील हरीशचंद्र घाडी, तसंच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील करूळ घाट येथील काझी बाबा यांच्याकडे तिला वारंवार नेण्यात आलं. तिथे डोक्याचे केस उपटणे, काळ्या कणकेच्या बाहुल्यांचा वापर, जिवंत कोंबडा, कच्चे मांस, गोमूत्र आणि विभूतीचे पाणी पाजणे यांसारखे कथित अघोरी प्रकार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
एकूण ९ जणांविरोधात गुन्हा दाखल
तक्रारीत असंही म्हटलं आहे की, डॉक्टरांनी नैसर्गिक गर्भधारणा किंवा आयव्हीएफचा सल्ला दिल्यानंतरही वैद्यकीय उपचारांकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलट अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात आले आणि महिलेवर विविध प्रकारे दबाव आणण्यात आलाया प्रकरणामुळे सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या राजकारणात आणि ठाकरे सेनेत मोठी खळबळ उडाली असून, आता या आरोपांवर संबंधित आरोपींची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हे सर्व आरोप तक्रारीत पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे तपासात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात?याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.