🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"१० रुपये जास्त घेतलेच कसे?" बीअरच्या लूटमारीवरून थेट मुख्यमंत्री विजय थलपतींकडे तक्रार; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

​"१० रुपये जास्त घेतलेच कसे?" बीअरच्या लूटमारीवरून थेट मुख्यमंत्री विजय थलपतींकडे तक्रार; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

तामिळनाडूमध्ये एक आगळावेगळा प्रकार समोर आला असून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी, "कोणत्याही क्षेत्रात लाच किंवा बेकायदेशीर वसुली होत असेल तर मला कळवा, मी तुमच्या पाठीशी उभा राहीन," असे आवाहन केले होते.

याच आवाहनाचा आधार घेत एका मद्यपीने वाइन शॉपमधील अतिरिक्त वसुलीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

घडलेल्या प्रकारानुसार, एका वाइन शॉपमध्ये बीअर खरेदी करताना दुकानचालकाने ती थंड करून देण्याच्या कारणावरून ग्राहकाकडून १० रुपये अतिरिक्त आकारले. यावर संबंधित युवकाने दुकानातच व्हिडिओ चित्रीत केला आणि मुख्यमंत्री विजय यांचे नाव घेत, "बीअरसाठी १० रुपये जास्त घेतले आहेत, आता यावर काय कारवाई करणार?" असा सवाल केला

मुख्यमंत्री विजय यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांना उद्देशून, "कोणीही लाच मागितली तर स्पष्ट नकार द्या आणि माझं नाव घ्या. त्यानंतर संबंधित व्यक्तीची माहिती मला द्या, पुढचं मी पाहतो," असे वक्तव्य केले होते. युवकाने याच विधानाचा संदर्भ देत अतिरिक्त वसुलीविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी अतिरिक्त वसुलीवर कारवाईची मागणी केली आहे, तर काहींनी या घटनेकडे विनोदी नजरेतून पाहत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.