Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाकीची मस्ती कॅफेत उतरवली! कॉपीचे ग्लास फेकले, कर्मचाऱ्यांना दमदाटी; 'त्या' उद्धट पोलीस उपनिरीक्षकावर अखेर कारवाईचा बडगा!

खाकीची मस्ती कॅफेत उतरवली! कॉपीचे ग्लास फेकले, कर्मचाऱ्यांना दमदाटी; 'त्या' उद्धट पोलीस उपनिरीक्षकावर अखेर कारवाईचा बडगा!


पुण्यातूनएकखळबळजनकबातमीसमोरआलीआहे. पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला एका कॅफेमध्ये केलेलं गैरवर्तन भोवले आहे. या गैरवर्तनाचाकथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्ष संदीप कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे . मिळाले ल्या माहिती नुसार , रात्रपाळीचे कर्तव्य बजावत असताना पुणे शहरातील शिरोळे रोडवरील एका कॅफेमध्ये प्रवेश करून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन  केल्या चा प्रकार समोर आला होता . दरम्यान हा सर्व प्रकार कॅफेमधील सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता . दरम्यान प्रकरणी डेक्कन पो ली स ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप कदम यांना निलंबित करण्यात आले आहे.

हातातील काठीने काउंटरवरील कॉफीचे ग्लास, खाद्य पदार्थ फेकले, कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा. मिळालेल्यामाहितीनुसार, सहा जूनला संदीप कदम हे रात्रपाळीवर कार्यरत होते. दरम्यान रात्रीच्या सुमारे पावणेदोनच्या सुमारास शिरोळे रोडवरील 'फ्लाइंग जिप्सी' कॅफेमध्ये ते गेले. त्या वेळी कॅफे बंद करण्याची तयारी सुरू होती. यावेळी कदम यांनी कॅफेतप्रवेशकेलाआणि हातातील काठीने कॅफेच्या काउंटरवरील कॉफीचे ग्लास आणि इतर खाद्य पदार्थ खाली पाडले. तसेच तेथे बसलेल्या ग्राहकांना तत्काळ उठून बाहेर जाण्यास सांगितले आणि कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरली. 

कॅफेमध्ये केलेलं गैरवर्तन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड, व्हिडिओ व्हायरल होताच कारवाईचा बडगा. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार कॅफेमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. त्यानंतर हासंपूर्णप्रकरणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या घटनेमुळे पोलिस खात्याची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका कदम यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांचे वर्तन बेजबाबदार, पोलिस दलाच्या शिस्तीला बाधा आणणारे आणि खात्याला अशोभनीय असल्याचे नमूद करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. परिणामीपोलीस उपनिरीक्ष संदीप कदम यांना एका कॅफेमध्ये केलेलं गैरवर्तन आताचांगलंच भोवले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.