🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली हादरली! महावितरण कर्मचाऱ्याचा ऑनड्युटी अमानुष खून; पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल.

सांगली हादरली! महावितरण कर्मचाऱ्याचा ऑनड्युटी अमानुष खून; पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल.


मिरज: शहरातील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये घुसून ऑपरेटरचा ऑन ड्युटी निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सुधीर पंडित लाटवडे (वय ३५, रा. हिंगणगाव-शिंदेवाडी, ता.कवठेमहांकाळ) असे मृताचे नाव आहे. सबस्टेशनमधील वॉचमनशी झालेल्या वादातून सदर वॉचमनचा मुलगा संशयित सौरभ निकम (वय २५ रा. बेडग ता. मिरज) याने हा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सांगली-मिरज रस्त्यालगत महावितरणच्या सबस्टेशनमध्ये सुधीर लाटवडे हे कार्यरत होते. बुधवारी ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर आले. या दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास सबस्टेशनमध्ये तैनात असलेल्या वॉचमनने आपली दुचाकी चार्ज करण्यासाठी सबस्टेशनमध्ये लावली होती. त्याला सुधीर यांनी विरोध केला. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हमरीतुमरीत झाले. या घटनेची माहिती सुधीर यांनी संबंधित वॉचमनच्या सुपरवायझरला दिली. त्यानंतर सुपरवायझरने त्याची अन्य ठिकाणी नेमणूक केली. दरम्यान, सबस्टेशनमध्ये दुसरा वॉचमन नेमण्यात आला. यादरम्यान, सुधीर सबस्टेशनमध्येच थांबून होते.

रात्री आठच्या सुमारास सुधीर यांनी नवीन वॉचमनला खानावळीतून डबा आणण्यासाठी पाठविले. यावेळी सुधीर एकटेच असल्याचे पाहून सदर वॉचमनचा मुलगा सौरभ निकम हा सबस्टेशनमध्ये घुसला व त्याने सुधीर यांच्या डोक्यात लोखंडी गजाने बेदम मारहाण करत त्यांचा चेंदामेंदा केला. गंभीर दुखापतीमुळे सुधीर यांचा जागीच मृत्यू झाला.

तासाभरानंतर नवा वॉचमन सुधीर यांचा डबा घेऊन सबस्टेशनमध्ये पोहोचला. त्याने तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, निरीक्षक संजीव झाडे, किरण चौगले, सोमनाथ वाघ, सहायक निरीक्षक संदीप शिंदे आदीनी भेट देऊन पाहणी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.