🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली हादरली! पत्नीला जिवंत जाळणाऱ्या नराधम पतीला न्यायालयाचा ऐतिहासिक दणका; सुनावली कठोर शिक्षा!

सांगली हादरली! पत्नीला जिवंत जाळणाऱ्या नराधम पतीला न्यायालयाचा ऐतिहासिक दणका; सुनावली कठोर शिक्षा!


सांगली जिल्ह्यातील विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पत्नीच्या निर्घृण हत्येप्रकरणी पतीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायाधीश आर.आर.भागवत यांनी आरोपी रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम (41) याला फाशीची शिक्षा तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.

संतोषने पत्नी दिपालीची केली क्रूर हत्या

ही घटना 7 जून 2021 रोजी खानापूर तालुक्यातील भुड येथे घडली होती.घरगुती वादातून आरोपीने पत्नी दिपाली कदम यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत पेटवले.त्यानंतर चाकूने गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दिपाली कदम यांचा 11 जून 2021 रोजी मृत्यू झाला होता.

ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाचा मोठा निर्णय
या प्रकरणी मयत महिलेचे भाऊ राहुल सुळे यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी सादर केलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा कठोर निर्णय दिला.या निकालामुळे पीडितेच्या मुलांना न्याय मिळाल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.