कोयना धरण सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाचे नामांतर झाले आहे. "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील याची माहिती दिली. पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर" असे नामांतर करण्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहसिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने घेतला आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. कोयना जलसागरास यापुर्वी शिवाजी जलसागर या नावाने संबोधले जात होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख योग्य नसल्याने नावामध्ये बदल करून छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव कोयना जलशायला द्यावे अशी मागणी होत होती. जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जलशयाचे नामांतर करण्याबाबत विनंती केली होती. महायुती सरकारने याबाबतचा शासन आदेश जारी करून कोयना जलसागरास छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.