🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विद्यार्थ्यांना धमकावणे बंद करा; कपिल सिब्बल यांचा सरकारला कडक इशारा

विद्यार्थ्यांना धमकावणे बंद करा; कपिल सिब्बल यांचा सरकारला कडक इशारा


दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांना सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने जारी केलेल्या इशाऱ्यावर माजी शिक्षण मंत्री आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दोन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंनी हे धमकीवजा आदेश तात्काळ मागे न घेतल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा सिब्बल यांनी शुक्रवारी दिला. कपिल सिब्बल यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला असून, अहिंसक मार्गाने आंदोलन करणाऱ्या एकाही विद्यार्थ्यावर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना कपिल सिब्बल यांनी दोन्ही विद्यापीठांच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला. आपल्या देशातील उच्च शैक्षणिक संस्थांचे कुलगुरू काय करत आहेत, हे पाहून मला आश्चर्य होत आहे. जंतर-मंतरवर जाणे हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग कसा ठरू शकतो? कुलगुरूंनी स्वतःला सरकारी कर्मचारी मानले असेल तर त्यांनी मानावे, पण विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना स्वातंत्र्य आहे.
तुम्हाला आपल्या देशातील विद्यार्थ्यांना सरकारी कर्मचारी बनवायचे आहे का? मग आपण लोकशाहीबद्दल कशाला बोलतो असा सवाल त्यांनी केला. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दिल्ली विद्यापीठ आणि जेएनयू प्रशासनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून विद्यार्थ्यांना आंदोलनापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार जंतर-मंतर येथील आंदोलनांवर निर्बंध आहेत. 
कोणत्याही बेकायदेशीर आंदोलनात सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच त्यांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या संधींवर परिणाम होऊन कायदेशीर कारवाई होऊ शकते. सोशल मीडियावरही जबाबदारीने व्यक्त व्हावे. विद्यापीठाच्या आचारसंहितेचा भंग झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा विद्यापीठांनी दिला होता.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.