🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'महिला IPS ट्रेनी बळजबरी करायची'; लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी उदय रेड्डींचा आत्महत्येचा प्रयत्न

'महिला IPS ट्रेनी बळजबरी करायची'; लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी उदय रेड्डींचा आत्महत्येचा प्रयत्न


हैदराबादच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीमधील एक गंभीर प्रकार समोर आला आहे. आयपीएसचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी महिला अधिकाऱ्याने त्यांचे सहकारी उदय कृष्ण रेड्डी यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले.

महिला अधिकाऱ्याच्या आरोपानंतर अट्टापूर पोलीस ठाण्यात उदय कृष्ण रेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर सोमवारी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत उदय कृष्ण रेड्डी यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच पीडितेबरोबर प्रेमसंबंध होते आणि तिच्याकडून संबंधांसाठी बळजबरी करत होती, असा आरोप त्यांनी केला.

पीडितेच्या लग्नानंतरही संबंधांसाठी दबाव
उदय कृष्ण रेड्डी यांनी चिठ्ठीत लिहिले की, आयपीएसचे प्रशिक्षण घेणारी महिला आणि माझे काही काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र तिचे लग्न झाले त्यानंतरही ती संबंध ठेवण्यास बळजबरी करत होती. ३० वर्षीय महिला आयपीएस अधिकाऱ्याने रेड्डी यांच्या विरोधात छेडछाड, लैंगिक अत्याचार आणि मारहाणीचा आरोप केल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. या घटनेमुळे रेड्डी यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. यानंतर रेड्डी रविवारी त्यांच्या मित्राच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी विषप्राशन केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान हा आत्महत्येचा प्रयत्न होता का? याबाबत पोलिसांनी अद्याप निश्चित माहिती दिलेली नाही.
उदय रेड्डी यांची प्रकृती गंभीर

विषप्राशन केल्यानंतर उदय कृष्ण रेड्डी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआर नगरच्या जयंती हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पीडितेने दाखल केलेल्या गुन्ह्याचाही तपास सुरू आहे.

पीडितेने कोणते आरोप केले?
३० वर्षीय पीडितेने आपल्या तक्रारीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिने म्हटले की, रेड्डी यांनी माझ्या अंगावर कंडोम फेकले, केस ओढले, गळा दाबण्याचा प्रयत्न केला, गळ्यावर चाकू ठेवला तसेच माझे खासगी व्हिडीओ चित्रीत करण्यात आले. माझ्या पतीला हे व्हिडीओ पाठवण्याची धमकीही दिली.

पीडितेने पुढे म्हटले की, उदय रेड्डी यांनी व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह मेसेज पाठवले होते. तसेच प्रशिक्षण घेणाऱ्या इतर महिला अधिकाऱ्यांसमोर माझा अपमान केला. तसेच १० जुलै रोजी उदय रेड्डीने माझ्या खोलीत संमतीविना प्रवेश केला. मला मारहाण करत माझे खासगी व्हिडीओ चित्रीत केले आणि ते माझ्या पतीला पाठविण्याची धमकी दिली. माझ्याबाबत अपप्रचार करून मला बदनाम करण्याचाही प्रयत्न उदय रेड्डी यांनी केला, असा दावा पीडितेने केला आहे.
हवालदाराचा झाला आयपीएस

उदय कृष्ण रेड्डी यांचा आयपीएस पदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तू पूर्वी कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अपमान केल्यानंतर त्यांना तो सहन झाला नाही. म्हणून त्यांनी आयपीएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली आणि त्यात यशही मिळवले. २०२३ मध्ये त्यांनी ७८० वा ऑल इंडिया रँक मिळवला होता.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.