उझबेकिस्तानच्या मध्यमवयीन महिला भारतात येत आहेत, पण इथे येताच त्या सौंदर्यवती बनतात आणि त्यानंतर जे काही होत आहे, ते पाहून पोलीसही सुन्न झाले आहेत. उझबेकिस्तानची 49 वर्षीय महिला लोला कायुमोवा हिला पोलिसांनी अटक केली आहे.
49 वर्षांच्या लोलाने 29 वर्षांची दिसण्यासाठी एक-दोन नाही तर तब्बल 7 सर्जरी केल्या. पोलीस आणि आयबीच्या संयुक्त टीमने लोलाला मॅक्स हॉस्पिटलजवळून पकडलं. पोलिसांपासून वाचण्यासाठी लोलाने प्लास्टिक सर्जरी करून आपला पूर्ण चेहरा बदलला होता. तसंच तिने बनावट मॅरेज सर्टिफिकेटचा वापर करून भारतामध्ये आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सही बनवलं होतं.
मागच्या वर्षी दोघींना पकडलं
या पूर्ण रॅकेटचा खुलासा 2025 च्या जून महिन्यात झाला. सुशांत गोल्फ सिट पोलिसांनी ओमेक्स अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये छापे टाकले आणि तिथे अवैधरित्या राहणाऱ्या निलोफर आणि होलिडा नावाच्या उझबेकिस्तानी तरुणींना अटक केली. लोला कायुमोवा आम्हाला लखनऊमध्ये घेऊन आल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. लखनऊमध्ये आल्यानंतर आमच्यावर शस्त्रक्रिया केली गेली आणि आमची ओळख बदलवण्यात आली, त्यानंतर इथे अवैधरित्या थांबून रॅकेट चालवलं गेलं, असं या दोन तरुणींनी पोलिसांना सांगितलं.या दोन महिलांच्या अटकेनंतर लखनऊ पोलिसांनी तपास आणखी जलद केला. लोलाने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनावट मॅरेज सर्टिफिकेट बनवून आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घेतलं. मॅरेज सर्टिफिकेटमध्ये लोलाने ज्याचं नाव नवरा म्हणून टाकलं तो तिचाच कस्टमर होता. ओळख लपवण्यासाठी लोलाने प्लास्टिक सर्जरीही केली. लोलाने लखनऊच्या ओमेक्स अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट विकत घेतला आणि ती स्वत:ला भारतीय नागरिक असल्याचं दाखवू लागली. वय लपवण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी लोलाने 7 वेळा प्लास्टिक सर्जरी केली, ज्यात चेहरा, ओठ, अंडरआर्म्स आणि प्रायव्हेट पार्टच्या कॉस्मेटिक सर्जरीचाही समावेश होता. डॉक्टरवरही पासपोर्ट-व्हिजा न पाहता जास्त रक्कम मिळत आहे म्हणून लोलाची सर्जरी केल्याचा आरोप आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.