🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आरोग्य विभागातील पदभरती आणि पदोन्नतीला वेग! आरोग्यमंत्र्यांनी दिले हे आदेश

आरोग्य विभागातील पदभरती आणि पदोन्नतीला वेग! आरोग्यमंत्र्यांनी दिले हे आदेश


मुंबई :- आरोग्य विभागातील रिक्त पदे, रखडलेल्या पदभरत्या आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या पदोन्नतीच्या प्रक्रियेला आता गती दिली जाणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कामात दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशारा देत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

फाईलचा प्रवास जलद करा, प्रत्येक स्तरावर जबाबदारी निश्चित करा, असे निर्देशही त्यांनी दिले. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य भवन येथे झालेल्या आस्थापना विषयक बैठकीत विभागातील विविध संवर्गांतील रिक्त पदे, पदभरती, पदोन्नती आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला. प्रशासनातील निर्णय प्रक्रिया गतिमान करून नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आरोग्य यंत्रणेला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पदभरतीची प्रक्रिया कोणताही अनावश्यक विलंब न करता पूर्ण करावी. तसेच चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. मात्र कामात हलगर्जीपणा किंवा दिरंगाई करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देशही आबिटकर यांनी दिले. 


पदोन्नतीचे प्रस्ताव प्रलंबित ठेवू नका
बैठकीत अधिपरिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या परिविक्षाधीन कालावधीची पूर्तता, पदोन्नती तसेच अन्य अडचणींवरही चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव विनाकारण प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश आबिटकर यांनी दिले. सेवाकालात कर्मचाऱ्यांना योग्य संधी आणि पदोन्नती मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी पदाच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीचाही त्यांनी आढावा घेतला. जिल्हा हिवताप अधिकारी संवर्गातील हिवताप कर्मचाऱ्यांना पदोन्नतीने नियुक्ती देण्यासंदर्भातील कार्यवाहीबाबतही बैठकीत चर्चा झाली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.